शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कामाचे चार तुकडे करून सर्वच ठेकेदारांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:43 IST

महापालिकेच्या विद्युत विभागाला साहित्य पुरविण्याच्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर नियमानुसार न्यूनतम दराच्या पुरवठादाराला काम देणे अपेक्षित असताना मात्र प्रशासनाने सर्वच ठेकेदारांना दर कमी करण्यास सांगून चार जणांना काम दिले. त्यामुळे प्रशासनाच्या सर्व कंत्राटदार समभाव जोपासण्याच्या प्रकाराबद्दल स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी जाब विचारला आणि कंत्राटदारांच्या साखळीला प्रशासनाची मान्यता असल्याचा आरोप केला.

ठळक मुद्देनगरसेवक संतप्त : मनपा प्रशासनाचा सर्व कंत्राटदार समभाव

नाशिक : महापालिकेच्या विद्युत विभागाला साहित्य पुरविण्याच्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर नियमानुसार न्यूनतम दराच्या पुरवठादाराला काम देणे अपेक्षित असताना मात्र प्रशासनाने सर्वच ठेकेदारांना दर कमी करण्यास सांगून चार जणांना काम दिले. त्यामुळे प्रशासनाच्या सर्व कंत्राटदार समभाव जोपासण्याच्या प्रकाराबद्दल स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी जाब विचारला आणि कंत्राटदारांच्या साखळीला प्रशासनाची मान्यता असल्याचा आरोप केला.दिनकर पाटील यांनी तर आयुक्त मुंढे यांच्या कारकीर्दीत असे ठराव येताच कसे? असा प्रश्न केला. अखेरीस या प्रकाराची तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश सभापती हिमगौरी आडके यांनी दिले. मनपाच्या पथदीप देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य खरेदीसाठी महापालिकेने वार्षिक दर मंजुरीसाठी निविदा मागविल्या होत्या. त्याचे सुमारे ९० लाख रुपयांचे काम मंजुरीसाठी स्थायी समितीवर सादर करण्यात आले होते. शुक्रवारी (दि. १२) सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यास कडाडून विरोध झाल्याने हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला.सामान्यत: एखाद्याच्या कामाच्या निविदा मागविल्यानंतर त्यातील प्राप्त निविदाधारकांपैकी न्यूनतम दर भरणाऱ्या कंत्राटदारांना काम दिले जाते; येथे विद्युत साहित्य खरेदीसाठी चार ठेकेदारांनी निविदा भरल्या आणि चारही पात्र ठरून त्यांना काम देण्यात आले. दर भरताना या चारही ठेकेदारांनी साखळी केली नसेल कशावरून, असा प्रश्न करीत उद्धव निमसे आणि दिनकर पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्त मुंढे यांच्यावरही कोरडे ओढले आणि अशाप्रकारच्या पारदर्शक कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले. त्यावर विद्युत विभागाचे अभियंता वनमाळी यांनी या प्रकारच्या निविदा पी टू प्रकारच्या असतात, असे सांगून खुलासा केला आणि यापूर्वीही असेच प्रकार होत असल्याचे सांगितल्यानंतर नगरसेवकांनी यापूर्वी चुकीचे काम झाले म्हणजे आताही तसेच चालू द्यायचे काय, नगरसेवकांना निविदेतील काही कळत नाही काय असा प्रश्न केला.वॉक विथ कमिशनर बेकायदेशीरनगरसेवक निधी मंजूर करूनही कामे होत नसल्याने दिनकर पाटील यांनी पुन्हा प्रशासन आणि आयुक्तांवर शरसंधान केले. बारा लाख रुपयांचा निधी प्रत्येक नगरसेवकाचा असल्याने प्रभागातील चार नगरसेवकांनी एकत्रितरीत्या सुचविलेले काम केलेच पाहिजे असे सांगताना त्यांनी तुकाराम मुंढे नगरसेवकांची कामे जाणीवपूर्वक रोखतात तसे आदेश त्यांनी अधिकाºयांना दिले असल्याचे सांगून अनेक आरोप केले. आयुक्त मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम बेकायदेशीर आहे, त्यासाठी शासनाची परवानगी तरी घेतली आहे काय, असा प्रश्न करून नगरसेवकांची कामे आयुक्त करता हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. वॉक विथ कमिशनर बेकायदेशीरनगरसेवक निधी मंजूर करूनही कामे होत नसल्याने दिनकर पाटील यांनी पुन्हा प्रशासन आणि आयुक्तांवर शरसंधान केले. बारा लाख रुपयांचा निधी प्रत्येक नगरसेवकाचा असल्याने प्रभागातील चार नगरसेवकांनी एकत्रितरीत्या सुचविलेले काम केलेच पाहिजे असे सांगताना त्यांनी तुकाराम मुंढे नगरसेवकांची कामे जाणीवपूर्वक रोखतात तसे आदेश त्यांनी अधिकाºयांना दिले असल्याचे सांगून अनेक आरोप केले. आयुक्त मुंढे यांचा वॉक विथ कमिशनर कार्यक्रम बेकायदेशीर आहे, त्यासाठी शासनाची परवानगी तरी घेतली आहे काय, असा प्रश्न करून नगरसेवकांची कामे आयुक्त करता हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक