शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शहांच्या वक्तव्याने युतीतील दरी रुंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 07:28 IST

सेना म्हणते गुजरातींमध्ये नाही दम; भाजपाची स्वबळाची तयारी पूर्ण

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केली तर ठीक, नाही तर निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याने युतीमध्ये अगोदरच असलेला दुरावा विस्तारला आहे. स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्णातील तीनही लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपाच्या गुजराती नेत्यामध्ये सेनेला उचलून पटकण्याचा दम नसल्याची खोचक प्रतिक्रिया शिवसेनेने व्यक्त केली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, लागून असलेल्या धुळे मतदारसंघातूनही भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भाजपाकडे दोन, तर सेनेकडे एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असले, तरी आगामी निवडणुकीत युती होणार की नाही, याविषयी अनिश्चितता आहे. सेनेने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला असला, तरी भाजपा मात्र अजूनही युतीच्या आशेवर असतानाच लातूर येथे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सेनेला डिवचणारे वक्तव्य केल्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात उचलून पटकण्याची भाषा भाजपाने केल्यामुळे सेनेनेही तितकेच उसळून प्रतिक्रिया दिली असून, गुजराती भाजपामध्ये सेनेला उचलून टाकण्याचे दम नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना घराघरात पोहोचली असून, पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी यापूर्वीच युती होणार नसल्याचे जाहीर केलेले असताना उचलून टाकण्याइतका दम असलेल्या भाजपाने युतीसाठी सेनेला गळ घालण्याचे कारण काय, असा सवालही केला जात आहे. दुसरीकडे भाजपानेदेखील स्वबळावर लढण्याइतपत ताकद जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात निर्माण केली असून, शिवसेनेने युती केली, तर त्यांचाच फायदा होणार असल्याचे म्हटले आहे.भारतीय जनता पक्षाने तीनही लोकसभा मतदारसंघात तयारी पूर्ण केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू आहे. शिवसेना युती करणार असेल, तर भाजपाच्या ताकदीचा त्यांना फायदाच होईल. अन्यथा भाजपा स्वबळावर लढण्यास तयार आहे. तशा सूचना पक्ष कार्यकर्त्यांनाही देण्यात आल्या आहेत.- दादा जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Amit Shahअमित शाहShiv Senaशिवसेना