शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महिला सुरक्षितता धोक्यात; एका दिवसात विनयभंगाच्या सहा घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 16:39 IST

शहरात एकाच दिवसात सहा महिला, मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना शुक्रवारी (दि.३) उघडकीस आल्या आहेत. यावरून शहर व परिसरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देमोटारीत संशयिताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लज्जा उत्पन्न करणारे कृत्य

नाशिक : मागील महिन्यात विनयभंगाच्या तब्बल दहा घटना घडल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांमध्ये असून गुरूवारी (दि.२) शहरात एकाच दिवसात सहा महिला, मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना शुक्रवारी (दि.३) उघडकीस आल्या आहेत. यावरून शहर व परिसरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.द्वारका परिसरातील बनकर चौकात एका पादचारी तरूणीचा पाठलाग करून दुचाकीस्वार तरूणाने पत्ता विचारण्याचा बहाणा करून तरूणीचा विनयभंग केल्याची घटना द्वारका परिसरात गुरूवारी (दि.२) घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पिडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तरूणी आपल्या मामाच्या घरी गेली होती. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास पिडित तरूणी घराकडे पायी जात असताना मोपेड दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात तरूणाने तरूणीची वाट रोखून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लज्जा उत्पन्न करणारे कृत्य भर रस्त्यात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अंधाराचा फायदा घेत संशयित दुचाकीवरून पसार झाला. याप्रकरणी त्याच्याविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या घटनेत सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत राहणाºया नव्या पंडीत कॉलनीमधील एका महिलेच्या घरातील लॅन्डलाईन दुरध्वनीवर सातत्याने वेगवेगळ्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून संपर्क साधत महिलेशी अश्लील भाषेत संभाषण साधत लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीसºया घटनेत अंबडलिंकरोडवर एका मोटारीत संशयिताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चौथी घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. येथील नारायणबापूनगर परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ संशयित आरोपी कुलदीप यादव याने पिडित तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न के ल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचवी घटना इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. संशयित प्रशांत दैतकर पाटील, सोनाली दैतकर पाटील, यमुना दैतकर पाटील, श्रेया सुर्यकांत प्रभू, सुर्यकांत शाम प्रभू यांनी मिळून पिडित तरूणीला शिवीगाळ करत अर्वाच्य भाषेत संवाद साधला. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार फिर्यादीच्या वडिलांनी दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंगnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय