शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

स्त्री रुग्णालयाचा वाद चिघळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 18:37 IST

प्रशासनाची कसोटी : आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

ठळक मुद्देदादासाहेब गायकवाड सभागृहालगतची जागा देण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध वसंत गिते यांना एक पाऊल मागे घ्यावे लागल्याची चर्चा

नाशिक : शासन अनुदानातून साकारणाऱ्या  शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाला भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहालगतची जागा देण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध सुरू केल्यानंतर शुक्रवारी (दि.२७) प्रभागाचे नगरसेवक व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी नागरिकांना सोबत घेऊन महापौरांसह आयुक्तांना निवेदन देत एल्गार पुकारल्याने स्त्री रुग्णालयाचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आजी-माजी आमदारांनी सदरचा विषय प्रतिष्ठेचा केल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यासह प्रशासनाचीही कोंडी झाली असून, हा तिढा सोडविण्यात प्रशासनाची कसोटी लागणार आहे.शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी शासनाने महापालिकेकडे जागेची मागणी केल्यानंतर बरेच वादविवाद होऊन मागील महासभेत भाजपा नगरसेवक सुप्रिया खोडे यांच्या प्रस्तावानुसार दादासाहेब गायकवाड सभागृहालगतच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महासभेच्या दुसºयाच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, पालकमंत्र्यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्याना तंबी दिल्यानंतर लगोलग ठराव करत तो आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हाती सुपुर्द करण्यात आला होता. त्यामुळे माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांना एक पाऊल मागे घ्यावे लागल्याची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी (दि.२६) पुन्हा एकदा वाद उफाळून आला. भाभानगर परिसरातील स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत गायकवाड सभागृहालगतच्या जागेत स्त्री रुग्णालयास तीव्र विरोध दर्शविला. शुक्रवारी (दि.२७) प्रभागाचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी महापौर रंजना भानसी, अतिरिक्त आयुक्तांसह विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांची भेट घेऊन आपले गाऱ्याहाणे त्यांच्यासमोर मांडले. उपमहापौरांनी पहिल्यांदाच उघडपणे विरोधाची भूमिका घेतल्याने स्त्री रुग्णालयाचा वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाभानगरच्या जागेत स्त्री रुग्णालय होऊ दिले जाणार नसल्याचा पवित्रा स्थानिक रहिवाशांनी घेतल्याने आमदार देवयानी फरांदे यांचीही आता प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आजी-माजी आमदारांच्या राजकीय वादात स्त्री रुग्णालयाचा प्रकल्प अडकल्याने सत्ताधारी भाजपातील पदाधिकाऱ्यासह प्रशासनाही कोंडीत सापडले असून, हा वाद कसा निपटायचा, याबाबत प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

टॅग्स :Womenमहिलाhospitalहॉस्पिटल