नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी प्रचारादरम्यान महिला मतदारांची मने जिंकली. मतदारसंघातून सर्वच पुरुष उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.नाशिक मध्य मतदारसंघात ५० टक्के महिला मतदार असल्याने महिला उमेदवार म्हणून भाजपाने प्रा. देवयानी फरांदे यांची निवड कली आहे. प्रा. फरांदे यादेखील तिक्याच सक्षमपणे निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांनी प्रचारात वेग घेतला असल्याचे दिसत आहे. उमेदवार प्रा. फरांदे उच्च शिक्षित, व्यक्तीमत्त्व, अभ्यासू वृत्ती व नगरसेवक ते उपमहापौर या कारकिर्दीमध्ये केलेली विकासकामे तसेच प्रसंगी लोकहितासाठी विरोधात नसून घेतलेले निर्णय अशा इतर अनेक अष्टपैलू गुणांमुळे महिला त्यांना निर्भयपणे साथ देत आहेत. प्रचाराचा आज अखेरच्या दिवशी प्रा. फरांदे यांनी महारॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन केले. गंगापूररोड, एम.जी. रोड, रविवार कारंजा, भद्रकाली भागातील मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्ते त्यांच्या रॅलीमधील गर्दीने फुलले गेले होते. त्यांच्या रॅलीत महिला, ज्येष्ठांबरोबरच तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. प्रचारादरम्यान त्यांच्याशी बातचीत केल्यावर प्रा. फरांदे म्हणाल्या, माझा लढा मनी - मसल पॉवर नसून तो माईन्ड पॉवर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महिला यांच्या साक्षीने लढविणार आहे. नाशिकच्या विकासाचे प्रश्न ऐरणीवर असून, महिलांवर होणारे अत्याचार, गुन्हेगारी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडणे यामुळे महिलावर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. मला संधी मिळाल्यास महिलांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र महिला भरारी पथक तसेच महिला पोलिसांची संख्या वाढविणे याबरोबरच संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही प्रा. देवयानी फरांदे यांनी सांगितले. (*वार्ताहर)