खेडगाव येथे महिला ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:37 PM2020-01-29T22:37:26+5:302020-01-30T00:13:58+5:30

महिला ग्रामसभेत ग्रामपंचायतींतर्गत केलेल्या कामांचा आढावा व करावयाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीकडे असलेल्या विविध योजना, महिलांसाठी अत्यावश्यक असलेली कामे, आमचा गाव-आमचा विकास आराखडा वाचन व ग्रामबाल समितीची स्थापना, जैविक विविधता समिती, ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

Women's Gram Sabha at Khedgaon | खेडगाव येथे महिला ग्रामसभा

खेडगाव येथे ग्रामसभेत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य अनिल ठुबे. समवेत सरपंच अर्चना उगले, ग्रामसेवक सोमनाथ ढोकरे आदी.

Next

खेडगाव : येथील महिला ग्रामसभेत ग्रामपंचायतींतर्गत केलेल्या कामांचा आढावा व करावयाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीकडे असलेल्या विविध योजना, महिलांसाठी अत्यावश्यक असलेली कामे, आमचा गाव-आमचा विकास आराखडा वाचन व ग्रामबाल समितीची स्थापना, जैविक विविधता समिती, ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी महिलांसाठी गावांतर्गत सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोझल मशीन व त्याबाबत जागृती, महिलांसाठी अत्यावश्यक सुविधांबाबत ग्रामपंचायत सदस्य अनिल ठुबे व सरपंच उगले यांनी मार्गदर्शन केले. अत्यावश्यक बाबींवर आढावा घेण्यात आला. यावेळी महिलांची जबाबदारी व कर्तृत्वावर सी. एस. विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीमती गांगुर्डे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ देण्यात आली.

Web Title: Women's Gram Sabha at Khedgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.