सुरगाणा : तालुक्यातील मांदा व म्हैसखडक येथे नेहरु युवा केंद्र नाशिक यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.म्हैसखडक येथे माणदेशी फाउंडेशनच्या फिल्ड ऑफिसर सुनंदा भुसारे यांनी महिलांसाठी शासकीय योजनेची माहिती दिली व घरगुती मिरची, करवंदाचे लोणचं कसे तयार करावे ह्या विषयी मार्गदर्शन केले. तसेच पेठ पंचायत समितीचे उपसभापती महेश टोपले यांनी देखील मार्गदर्शन केले.युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार नाशिक जिल्हा समन्वयक कमल त्रिपाठी, सुनिल पंजे, दिलीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंदा भुसारे यांनी बचत गटाच्या १५२ महिलांना प्रत्येकी १ किलो मशरूमची बियाणे मोफत वाटप केले. यावेळी प्रेमराज पवार, जितेंद्र गायकवाड, अनिता कामडी, सावित्री, दुर्गा गायकवाड, योगेश गायकवाड, रमेश बोरसे आदी उपस्थित होते.
म्हैसखडक येथे महिला दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:34 IST
सुरगाणा : तालुक्यातील मांदा व म्हैसखडक येथे नेहरु युवा केंद्र नाशिक यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
म्हैसखडक येथे महिला दिन साजरा
ठळक मुद्देसुरगाणा : तालुक्यातील मांदा व म्हैसखडक येथे नेहरु युवा केंद्र नाशिक यांच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.