शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

महिला बालकल्याण समिती भाजपाकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:57 IST

नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपाच्या हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

नाशिक : नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपाच्या हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. अन्य चार समित्यांमध्ये शिवसेनेने भाजपाला आव्हान दिले असून, त्यामुळे युतीतच पदांसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी बुधवारी (दि.१७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, भाजपाचे बहुमत असतानाही शिवसेनेनेदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, शहर सुधार समिती तसेच वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुका गुरुवारी (दि.१८) होणार आहे. त्यासाठी बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आव्हान केले नाही. मात्र शिवसेनेने मात्र अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक समितीत एकूण नऊ सदस्य असून त्यातील पाच सदस्य भाजपाचे असल्याने समितीवर याच पक्षाचे वर्चस्व आहे, परंतु तरीही सेनेने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. देशात आणि राज्यात महापालिकेची युती आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेतदेखील युती व्हावी यासाठी सेनेलाही सत्तेचा वाटा मिळावा, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले.  समित्या आणि त्यात अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे- महिला व बालकल्याण - सभापतिपद- हेमलता कांडेकर (भाजपा), उपसभापती- रंजना प्रकाश बोराडे (शिवसेना), डॉ. सीमा ताजणे (भाजपा).वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती- सभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), अंबादास पगारे व डॉ. दीपाली कुलकर्णी (दोघेही भाजपा), उपसभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), अंबादास पगारे व पूनम धनगर (भाजप).शहर सुधार समिती- सभापती- सुदाम डेमसे (शिवसेना), अनिल ताजनपुरे (भाजपा), उपसभापती- सुदास डेमसे (शिवसेना), छाया देवांग (भाजपा).विधी समिती- सभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), सुमन सातभाई (भाजपा), उपसभापती- चंद्रकांत खाडे व सूर्यकांत लवटे (शिवसेना), नीलेश ठाकरे (भाजपा).

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा