गत वर्षापासूनच महिलांची ‘अस्मिता’ थंड बस्त्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:25 PM2020-02-25T23:25:35+5:302020-02-26T00:11:48+5:30

राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खºया अर्थाने काळजी घेणाºया ‘अस्मिता प्लस’ योजनेला वर्षभरातच घरघर लागली असून, गत सहा महिन्यांपासून मोफत किंवा अत्यल्प दरातील सॅनिटरी नॅपकिन्स मिळणे बंद झाले आहे.

Women's 'Asmita' has been in a chill since last year! | गत वर्षापासूनच महिलांची ‘अस्मिता’ थंड बस्त्यात !

गत वर्षापासूनच महिलांची ‘अस्मिता’ थंड बस्त्यात !

Next

धनंजय रीसोडकर।
नाशिक : राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खºया अर्थाने काळजी घेणाºया ‘अस्मिता प्लस’ योजनेला वर्षभरातच घरघर लागली असून, गत सहा महिन्यांपासून मोफत किंवा अत्यल्प दरातील सॅनिटरी नॅपकिन्स मिळणे बंद झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातून ३९ महिला बचतगटांनी त्यासाठी नोंदणी केलेली असून, त्यांना गत दिवाळीनंतर सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठाच झालेला नसल्याने मोठ्या कंपन्यांच्या दबावातून ही योजना गुंडाळली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त यंत्रणेलादेखील योजनेच्या अंमलबजावणीच्या खंडाबाबत काहीच सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे.
गतवर्षी १६ लाखांवर महिला लाभार्थी
तब्बल १५ लाख ९८ हजारपेक्षा जास्त महिला आणि जिल्हा परिषद शाळेतील ४७ हजारपेक्षा जास्त मुलींनी या शासकीय योजनेचा लाभ घेतला होता. २८ हजार पेक्षा जास्त महिला अस्मिता सॅनिटरी नॅपकिन विक्र ीचा व्यवसाय करीत असल्याची शासनाकडे नोंद होती. तसेच त्यांना सॅनिटरी नॅपकिन पोस्टाद्वारे घरपोच मिळणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अस्मिता अ‍ॅपद्वारे अस्मिता, अस्मिता प्लस व अस्मिता बजार या तिन्ही योजनांची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

माफक दरात सॅनिटरी पॅड
अस्मिता योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यास प्रारंभ झाला होता. दोन आकारांची आठ नॅपकिन्सची पाकिटे ग्रामीण महिलांना अनुक्रमे २४ आणि २९ रु पयांना उपलब्ध करून देण्यात आली होती. वितरकांकडून सॅनिटरी नॅपकिनचे पाकिटे खरेदी करून बचत गटांमार्फत त्यांची परस्पर विक्र ी करण्यासही मंजुरी देण्यात आली होती.

पाच रुपयातील सुविधा
ग्रामीण भागातील फक्त १७ टक्के महिला या मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. उर्वरित महिलांना त्यांच्या किमती परवडत नसल्याने सॅनिटरी नॅपकिनच्या वापराअभावी विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच मुली आणि महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत अस्मिता योजना जाहीर करण्यात आली होती. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयांमध्ये आठ सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना राबविण्यात आली होती. तसेच मुलींना वर्षभरात १३ पाकिटे उपलब्ध करून देण्याचा निर्णयदेखील झाला होता.

सात लाख मुलींना अस्मिता कार्ड
अस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १७ वयोगटांतील किशोरवयीन मुलींना त्यासाठी किशोरवयीन मुलींची आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करून त्यांना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुली बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकिन खरेदी करतील. पहिल्या टप्प्यात राज्यातील साधारण सात लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार नियोजन आखण्यात आले होते. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना पाच रु पयांप्रमाणे विक्र ी केलेल्या पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रती पॅकेट १५.२० रु पयांप्रमाणे अनुदान शासन बचतगटांना देण्याचे निश्चित झाले होते.

Web Title: Women's 'Asmita' has been in a chill since last year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.