पेठ : सप्तशृंगगडावर देवीचा नवस फेडण्यासाठी जात असलेल्या गुजरात राज्यातील भाविकांच्या जीपला राऊतमारा फाटा नजीक अपघात होऊन त्यात एक मिहलेचा गाडीखाली दबून जागीच मृत्यू झाला आणि अन्य तीन जण जखमी झाले आहेत.गुजरात राज्यातील तामसडी ता. धरमपूर जि. बलसाड आणि कोसंबा ता. जि. बलसाड येथील मोकाशी कुटुंबीय आपल्या मुलाचा नवस फेडण्यासाठी सप्तशृंगगडावर खाजगी जीपने जात होते. ननाशी जवळील राऊतमारा फाटा जवळील घाटामध्ये एक वळणावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या हेडलाईटचा प्रखर प्रकाश चालकाच्या डोळ्यावर पडल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये घुसून पलटी झाली. यात गाडीमध्ये बसलेली महिला नयना मगन मोकाशी (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील ताई मगन मोकाशी (२५), रवी मगन मोकाशी (२२), शामली लक्षु राकड (४०) असे तिघे जखमी झाले आहेत.जेसीबीच्या मदतीने पलटी झालेली जीप उचलून नयना मोकाशी यांचा मृतदेह बाहेर काढला. पेठ ग्रामीण रु ग्णालयात मृत देहाचे शवविच्छेदन करु न मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.फोटो -१६ ओसीटीपेठ ०२राऊत माळा फाटा येथे पलटी झालेली जीप.
खाजगी जीप अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 18:33 IST
पेठ : सप्तशृंगगडावर देवीचा नवस फेडण्यासाठी जात असलेल्या गुजरात राज्यातील भाविकांच्या जीपला राऊतमारा फाटा नजीक अपघात होऊन त्यात एक ...
खाजगी जीप अपघातात महिला ठार
ठळक मुद्देपेठ : गुजरातमधील भाविकांपैकी ३ प्रवासी जखमी