शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महिला रुग्णालय पुन्हा वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:24 IST

भाभानगर येथे प्रस्तावित महिला रु ग्णालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या प्रकाश क्षीरसागर यांनी याचिका मागे घेतली असली तरी महापालिका प्रशासन आणि स्थायी समिती सभापतींकडे हरकत घेतली आहे. त्यावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देनागरिकांची हरकत : पूररेषेत नियोजित बांधकाम असल्याचा दावा

नाशिक : भाभानगर येथे प्रस्तावित महिला रु ग्णालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या प्रकाश क्षीरसागर यांनी याचिका मागे घेतली असली तरी महापालिका प्रशासन आणि स्थायी समिती सभापतींकडे हरकत घेतली आहे. त्यावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.शासनाच्या माध्यमातून शहरात शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी आमदार देवयानी फरांदे आग्रही असून, त्यांनी भाभानगर येथील कर्मचारी दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाच्या जागेजवळील ९ हजार ६०० चौरस मीटरची जागा त्यांनी निवडली आहे. त्यास माजी आमदार वसंत गिते यांनी विरोध केल्याने भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. यासंदर्भात प्रकाश क्षीरसागर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी मागे घेतली असली तरी न्यायायलयाच्या निर्देशानुसार त्यांनी महापालिका आयुक्त आणि स्थायी समिती सभापती यांच्याकडे हरकत घेतली आहे.दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाºया विविध प्रकारच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी पाहता तेथे सध्या असलेली जागा वाहनतळासाठी अपुरी आहे. त्यातच या ठिकाणी शंभर खाटांचे रुग्णालय झाल्यास वाहनतळासाठी जागा कोठून येणार? असा प्रश्न केला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, नियोजित बांधकाम हे जलसंपदा खात्याने आखलेल्या नासर्डी नदीच्या पूररेषेत परिसर येत आहे. त्यामुळे पूररेषेत काम करण्यास परवानगी दिली जाते का? असा प्रश्न क्षीरसागर यांनी केले आहे. सर्वांत महत्त्वाचा विषय हरकतीतच १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत झालेल्या कार्यक्र मांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांचा विचार करून रुग्णालय बांधण्याचा फेरविचार करावा, अशी मागणी हरकतपत्रात करण्यात आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका