इंदिरानगर : चेतनानगर येथून ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र सकाळच्या सुमारास चोरट्यांनी हिसकावून नेले.चेतनानगर परिसरातील पार्वती बंगला येथे राहणाऱ्या मंगला रघुनाथ निकम (६०) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ निकम या सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकानातून सामान घेऊन घरी जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला़ याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)