खर्डे : वाखारी (ता. देवळा) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जिजाबाई जिभाऊ शिरसाठ यांची निवड करण्यात आली. या सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे.सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष विलास अहिरे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. गुरु वारी देवळा येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी डी. एन. देशमुखयांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.सोसायटीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अध्यक्षपदी महिलेची निवड झाल्याने या निवडीला एक वेगळे महत्त्व आले. जिजाबाई शिरसाठ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. मावळते अध्यक्ष विलास अहिरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष जिजाबाई शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संचालक रंगनाथ जाधव, प्रताप ठाकरे, धर्मा पवार, योगेश गुंजाळ, प्रकाश शिरसाठ, तानाजी आहेर, रघुनाथ गुंजाळ, मुलकनबाई पवार, श्री.बच्छाव, सचिव गोकुळ जगदाळे, नितीन शिरसाठ उपस्थित होते.फोटो ओळ(११ वाखारी) -
वाखारी सोसायटीच्या अध्यक्षपदी महिलेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:57 IST
वाखारी (ता. देवळा) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जिजाबाई जिभाऊ शिरसाठ यांची निवड करण्यात आली. या सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे.
वाखारी सोसायटीच्या अध्यक्षपदी महिलेची निवड
ठळक मुद्देइतिहासात प्रथमच : रोटेशनने झाली निवडणूक