शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

चेहेडीत दारणा नदीपात्रात महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:13 IST

चेहेडी गावातील घाटाजवळ दारणा नदीपात्रात सायंकाळी सहाच्या सुमारास एक ६० ते ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. तिच्या अंगात लाल ब्लाऊज, गळ्यात तुळशीची माळ आहे. तिची ओळख पटलेली नाही.

नाशिकरोड : चेहेडी गावातील घाटाजवळ दारणा नदीपात्रात सायंकाळी सहाच्या सुमारास एक ६० ते ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. तिच्या अंगात लाल ब्लाऊज, गळ्यात तुळशीची माळ आहे. तिची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सराफ दुकानात चोरीनाशिकरोड : बिटको महाविद्यालयामागील जगताप मळा येथे ओम गुरु ज्वेलर्स हे दुकान मंगळवारी रात्री फोडून चोरट्याने ४३ हजारांचे दागिने चोरून नेले. देवळालीगाव बाबू गेणू रोड येथे राहणारे पंकज मधुकर गव्हाणे यांचे जगताप मळ्यात ओम गुरु ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री चोरट्याने शटरचे कुलूप तोडून दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ४३ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलाला गोणीत डांबलेदेवळालीगाव रोकडोबावाडी येथे पाच वर्षाच्या मुलास दोघांनी गोणीत डांबून ठेवल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात देवळालीगाव रोकडोबावाडी येथील बाली आत्माराम पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा राघव दुकानात साखर आणण्यास गेला असता, बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने त्याचा शोध घेतला जात असताना प्रतीक इंगळे व पंकज इंगळे या दोघांनी राघवला गोणीत घातलेले आढळले.वार करून मोबाइल हिसकावलाविहितगाव, मथुरा रोड येथे गुरुवारी रात्री दोघे मित्र रस्त्याने पायी घरी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या तिघा युवकांनी एकाच्या पाठीत हत्याराने वार करून मोबाइल चोरून नेला.विहितगावच्या समर्थनगर येथे राहणारा सिध्दार्थ जगन जाधव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्र रोशन जयप्रकाश शर्मा याच्या सोबत घरी पायी जात होता. पथदीप बंद असल्याने अंधारात मोबाइलमधील लाइट सुरू केला होता. मथुरा रोड येथे पिठाच्या गिरणीजवळ मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी रोशनच्या पाठीत हत्याराने मारले व दोघांनी हत्याराचा धाक दाखवत दहा हजारांचा मोबाईल हिसकावून नेला.गळफास लागून मुलीचा मृत्यूएकलहरा गेट येथे घरात साडीची झोळी बांधून खेळत असलेल्या मुलीचा त्याच साडीचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजना सुनील अहिरे (१४) असे या मुलीचे नाव असून, बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरातच बांधलेल्या साडीच्या झोळीत ती झोका खेळत होती. या दरम्यान, ती बसलेल्या झोळीचाच तिला अचानक गळफास बसला. त्यात श्वास गुदमरून ती मरण पावली. ही बाब तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ नाशिकरोड पोलीस ठाण्याला खबर दिली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.घरात घुसून मारहाणमालकाजवळ व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार केल्याच्या कारणावरून देवळालीगाव मालधक्का रोड येथे घरात घुसून चौघांनी संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली. देवळालीगाव राजवाडा, सिद्धार्थनगर येथील नसीर करीमखान पठाण याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संशयित हमीद सुलेमान शेख, सलीम हमीद शेख, कयूम हमीद शेख, अजीम हमीद शेख (सर्व, रा. सिद्धार्थनगर) यांनी घरी घुसून तुझा भाऊ जमालने दुकानमालकाजवळ व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार का केली अशी विचारणा करून शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमिष दाखवून महिलेची ८० हजारांची फसवणूकनाशिकरोड : चांदगिरी येथील महिलेस मोबाइलवर कमी किमतीत कपडे विकण्याचे आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने ८० हजारांची फसवणूक केली.चांदगिरी येथील कृष्णा खंडेराव बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २२ ते २४ आॅगस्टदरम्यान त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीने संदेश पाठवला. कमी किमतीत कपडे देण्याचे आमिष दाखवले. पत्नीकडून क्यू आर कोडद्वारे ८० हजार रुपये स्वीकारले. मात्र कपडे दिले नाहीत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात महिलेच्या फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी