शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला बळजबरीने रिक्षात बसवून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 01:08 IST

पेठरोड परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहितेला बळजबरीने रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून रिक्षामध्ये बसवून येथील शरदचंद्र पवार बाजार समितीमध्ये नेऊन दोघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देदोघांना अटक : गस्त पथकाचे दुर्लक्ष भोवले

पंचवटी : पेठरोड परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहितेला बळजबरीने रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून रिक्षामध्ये बसवून येथील शरदचंद्र पवार बाजार समितीमध्ये नेऊन दोघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, रविवारी रात्रीच्या सुमारास विवाहिता पायी जात असताना तिला दोघांनी अडवून बळजबरीने रिक्षा (एमएच १५, एफयू ३२७४) मध्ये ओढले. पेठरोडवरील बाजार समितीच्या परिसरात महिलेवर बलात्कार केला. तेथून पुन्हा पीडितेला रिक्षातून मखमलाबाद शिवारातील एका बांधकामाच्या ठिकाणी नेऊन पुन्हा अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी बाळू नारायण तायडे व त्याचा पेठरोडवरील पवार मळा येथील साथीदार रिक्षाचालक दिगंबर विठोबा कुंदे या दोघांना अटक केली आहे.‘त्या’ पोलिसांचा निष्काळजीपणारविवारी (दि.३१) पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयावरून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा अडविल्याचे समजते. यावेळी संशयिताने पीडितेला स्वत:ची पत्नी असल्याचे सांगितले तसेच पोलिसांना ‘चहापाणी’ दिल्याची चर्चा असून, संबंधित पोलिसांनी कर्तव्यदक्षता दाखविली असती तर पीडितेची वेळीच सुटका झाली असती असे बोलले जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारArrestअटक