शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागणाऱ्या श्रीरामपूरच्या महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:46 IST

लासलगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील ललवाणी कुटुंबीयांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्यात मदत करण्याकरिता तक्रारदार महिलेने २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. या खंडणीतील ५० हजार रुपयांची रक्कम लासलगाव येथे एका लॉजवर स्वीकारताना श्रीरामपूर येथील महिलेला बुधवारी (दि.२८) दुपारी लासलगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या महिलेला मदत करणाऱ्या अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलासलगाव : २५ लाखांची खंडणीची मागणी; साथीदारांवरही गुन्हा

लासलगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील ललवाणी कुटुंबीयांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्यात मदत करण्याकरिता तक्रारदार महिलेने २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. या खंडणीतील ५० हजार रुपयांची रक्कम लासलगाव येथे एका लॉजवर स्वीकारताना श्रीरामपूर येथील महिलेला बुधवारी (दि.२८) दुपारी लासलगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या महिलेला मदत करणाऱ्या अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लासलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील अल्केश झुंबरलाल ललवाणी व त्यांचे भाऊ पारस ललवाणी यांच्या विरोधात श्रीरामपूर येथील ज्योती चंदुलाल कोठारी या महिलेने जामनेर पोलीस ठाणे येथे बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकांचे लैंगिक अपराध यापासून संरक्षण आदी कलमान्वये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व तक्रार मागे घेण्यासाठी ज्योती कोठारी या महिलेसह तिच्या साथीदारांनी सुमारे २५ लाख रुपयांची खंडणी ललवाणी कुटुंबीयांकडून मागितली होती. सदर रक्कम ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील ऐश्वर्या लॉज या ठिकाणी देण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात अल्केश झुंबरलाल ललवाणी यांनी लासलगाव पोलीस कार्यालयात तक्रार दिली होती.लॉजवर धाड टाकून अटकबुधवारी दुपारी लासलगावचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ऐश्वर्या लॉज येथे धाड टाकत खंडणी मागितलेल्या रकमेपैकी सुमारे ५० हजार रुपयांची रक्कम घेताना ज्योती कोठारी (रा. श्रीरामपूर) या महिलेला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये या महिलेला मदत करणारे प्रफुल्ल लोढा (रा.जामनेर), सुनील कोचर (रा. सिल्लोड, जि.औरंगाबाद) यांच्यावरदेखील लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लासलगावची निवड का?या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते जामनेर येथील आहेत, तर तक्रारदार महिला ही श्रीरामपूरची आहे. परंतु, खंडणी मागण्यासाठी या महिलेने लासलगावची निवड का केली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. लासलगाव पोलीस त्यादृष्टीने पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग