चांदवड : चांदवड येथील रेणुका माता मंदिराचे घाटाखाली मोटार सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक ७२ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. त्यांचे उपचार सुरू असताना त्या मरण पावल्या. अपघातातील अज्ञात वाहन पळून गेले. लक्ष्मीबाई पारवे (७२) या शनिवारी श्री रेणुका देवी मंदिराच्या खाली घाट मोटारसायकलने उतरत असताना पाठीमागून येणाऱ्या वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात औषधोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला नेत असताना त्या मरण पावल्या. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चांदवड नजीक अपघातात एक महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:47 IST