शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

झोपलेला बिबट्या पाहताच महिलेला आली भोवळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 01:09 IST

सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात शनिवारी (दि.२८) सकाळी आठ वाजताच्या सुमारास एक महिला वालवडीच्या शेतात कामाला गेली होती. त्यावेळी एका सरीवर तिला बिबट्या पडलेला दिसला. त्या बिबट्याला पाहून सदर महिलेची घबराट होऊन तिला जागेवरच भोवळ आली; पण स्वत:ला सावरत व आरडाओरड करीत  तिने तेथून पलायन केले.  

ठळक मुद्देचापडगाव शिवारातील घटना : शेतकऱ्यांनी पाहणी केल्यावर निघाली मृत मादी

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात शनिवारी (दि.२८) सकाळी आठ वाजताच्या सुमारास एक महिला वालवडीच्या शेतात कामाला गेली होती. त्यावेळी एका सरीवर तिला बिबट्या पडलेला दिसला. त्या बिबट्याला पाहून सदर महिलेची घबराट होऊन तिला जागेवरच भोवळ आली; पण स्वत:ला सावरत व आरडाओरड करीत  तिने तेथून पलायन केले.  शेतकऱ्यांनी येऊन खात्री केली असता, सदरचा बिबट्या मृत असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, न्युमोनिया आजाराने बिबट्या मादीचा मृत्यू झाल्याचे वन विभागाने सांगितले.  तालुक्यातील दापूर व  चापडगाव शिवार हा बागायती परिसर आहे. भोजापूर धरणामुळे या भागात पिकांसाठी बारमाही पाणी उपलब्ध असते. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात बागायती पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो, तसेच डोंगराळ भाग असल्याने या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. सिन्नर - अकोले रस्त्यालगत चापडगाव शिवारात गट नंबर ५२ मध्ये रेवजी चिमा आव्हाड यांची शेतजमीन आहे. मंगला आगिवले (३७) ही महिला सकाळी शेतात काम करण्यासाठी गेली होती. शेतात बिबट्या झोपलेला असल्याची माहिती आजूबाजुच्या शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांनाही आश्चर्य वाटले. महिलेने आरडाओरड केल्यानंतरही बिबट्या जागचा हलला कसा नाही. ही महिला गणेश रामनाम आव्हाड यांची शेतजमीन हिश्श्याने करते. परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांनी दबक्या पावलांनी शेतात प्रवेश केला. पडलेल्या बिबट्याचा अंदाज घेत एकेक पाऊल पुढे टाकले. तरी बिबट्या निद्राधीन. लांबूनच खडाही टाकून पाहिला; मात्र बिबट्याची काहीच हालचाल दिसेना. मग दोन-चार जणांनी धाडस दाखवत पुढे जाऊन शहानिशा केली असता, बिबट्या मृत आढळून आला. शेतमालक आव्हाड यांनी वन विभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल प्रीतेश सरोदे, के. आर. इरकर आदींसह कर्मचारी दाखल झाले. न्युमोनिया व उपासमारीने मृत्यू वनपरीक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन वर्षीय मृत मादी बिबट्याला शवविच्छेदनासाठी दोडी येथे हलविले. पशुधन विकास अधिकारी वर्पे यांनी शवविच्छेदन केले. त्यात मादी बिबट्याला न्युमोनिया झालेला आढळून आला. न्युमोनियामुळे तिच्या अंगात शिकार करण्यासाठी त्राण उरले नसावेत आणि त्यातच उपासमार झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. माळेगाव- मोहदरी येथील वनोद्यानात या मादी बिबट्यावर अग्निसंस्कार करण्यात आले. सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. 

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या