शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या आवारात महिलेला मारहाण; एक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:02 IST

अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी करण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेस आवारातच मारहाण करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि.७) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून दुसरा फरार झाला आहे.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : अवैध दारु विक्रीस विरोध केल्याचा राग

पिंपळगाव बसवंत : अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी करण्यासाठी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेस आवारातच मारहाण करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि.७) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून दुसरा फरार झाला आहे.पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेडरोड परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची तक्रार सोमवारी महिलांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर अवैध दारू विक्रेत्यांकडून संबंधित महिलांना दमदाटी करण्याचा प्रकार सुरु झाला होता. मंगळवारी पुन्हा काही महिला दारु विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. ते समजताच दोन तरूणांनी थेट पोलीस ठाण्याच्या आवारात जाऊन महिलांना धमकावले. त्यातील एका तरूणाने महिलेला मारहाण केली. त्यानंतर सदर महिला बेशुद्ध पडल्याने त्यांना सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकारामुळे सदर महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी चंद्रकला वाघमारे या महिलेने केली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच हा प्रकार घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.पिंपळगाव शहरातील शास्त्रीनगर व उंबरखेड परिसरात बहुतांश ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्र ी होत असल्याने पोलीस प्रशासनास निवेदन देऊन सुद्धा कारवाई झाली नाही. अवैध धंदे करणाऱ्यांकडून महिला वर्गाला धमकवण्याचे व मारहाण करण्याचा प्रकार घडला. पोलीस प्रशासनाचेच त्यांना पाठबळ असल्याचा आरोप करीत पोलीस निरीक्षक यांची तातडीने बदली करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

अवैध दारू विक्री प्रकरणी महिलांनी पोलिसांना निवेदन दिल्यावर तातडीने दखल घेत कारवाई करणे गरजेचे होते. पोलिसांनी कारवाई न केल्याने महिलेला पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण करण्यापर्यंत दारु विक्रेत्यांनी मजल गाठली आहे. आर्थिक तडजोडीमुळेच अवैध दारु विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आम्ही त्या महिलेच्या पाठीशी आहोत.- गणेश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र दारू बंदी जन आंदोलन समिती, पिंपळगाव

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस