शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अनर्थ टळला : आकाशात उठलेल्या काळ्याकुट्ट धुराच्या लोटांमुळे वडाळावासीयांच्या काळजात धस्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:53 IST

सिडको उपकेंद्राचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परतेने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहचून लागलेली आग विझविल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देएका जागरूक नागरिकाने ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात दुरध्वनीप्रतिनिधीने माहिती घेत साठेनगर भागात कचरा व गवताला आग लागल्याची खात्री केली सिडको उपकेंद्राचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी

नाशिक : वडाळागाव परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर परिसरातील मोकळ्या भुखंडावर परिसरातील भंगार माल गुदामाच्या कामगारांनी नको असलेला कचरा फेकून दिल्याने मोठा ढीग साचला होता. या ढीगाला बुधवारी (दि.२१) संध्याकाळी आग लागली. यामुळे काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उंच उठल्याने परिसरातील नागरिकांच्या काळजात धस्स झाले.संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एका जागरूक नागरिकाने ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात दुरध्वनीवर संपर्क साधून वडाळागावाच्या दिशेने आकाशात मोठ्या प्रमाणात काळाकुट्ट धूर दिसत असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रतिनिधीने संबंधित गावात याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता साठेनगर भागात कचरा व गवताला आग असल्याची खात्री पटली. त्यानंतर तातडीने अग्निशामक दलाच्या मुख्यालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. सिडको उपकेंद्राचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परतेने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहचून लागलेली आग विझविल्याने अनर्थ टळला. मोकळ्या भुखंडावर आग लागल्यामुळे वा-याने आग रौद्रावतार धारण करण्याची शक्यता होती. जवळच साठेनगर ही गोरगरीब कष्टक-यांची वसाहत असल्यामुळे धोका वाढला होता; मात्र तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचल्याने अनर्थ टळला व रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. आग कोणी लावली याबाबत माहिती मिळू शकली नाही. उघड्यावर शौचासाठी जाणाºया काही लोकांनी धुम्रपान करताना दाखविलेल्या निष्काळजीमुळे कच-याने पेट घेतला असावा अन्यथा भंगार गुदामांमधील कामगारांनी कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा या भागात सुरू होती.

 

टॅग्स :fireआगNashikनाशिक