शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काम न करताच नाशिकमध्ये ठेकेदाराला चौदा लाख रूपयांचे देयक अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 14:35 IST

गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम ठेकेदारांकरवी केले जात असून, शासन त्याचे पैसे अदा करणार असतानाही आजपावेतो दोन ते तीन वेळा रेशन दुकानदारांकडूनच पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचा-यांनी याकामाचे पैसे गोळा केले आहेत.

ठळक मुद्दे डाटा एंट्रीच्या पैशांबाबत पुरवठामंत्र्यांकडे तक्रारपुरवठा खाते : पैसे मागणीच्या तक्रारीची चौकशी

नाशिक : शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम करणा-या ठेकेदाराला अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही स्थानिक पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचारी रेशन दुकानदारांकडून पैसे गोळा करीत असल्याची बाब ध्वनीचित्र फितीने व्हायरल झाल्याने या संदर्भात पुरवठा मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. दुसरीकडे काम न करताच, ठेकेदाराला चौदा लाख रूपये अदा करण्याची जिल्हा पुरवठा खात्याची भुमिकाही संशयाच्या फे-यात सापडली आहे.गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम ठेकेदारांकरवी केले जात असून, शासन त्याचे पैसे अदा करणार असतानाही आजपावेतो दोन ते तीन वेळा रेशन दुकानदारांकडूनच पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर्मचा-यांनी याकामाचे पैसे गोळा केले आहेत. दुकानदारांनी पैसे देऊनही ठेकेदाराने सदोष कामे केल्याच्या तक्रारी आहेत. आधारक्रमांक चुकीचा टाकणे, पुरेसे नंबर न टाकणे, कोणाचा आधार दुस-यालाच जोडणे अशा अनेक प्रकारामुळे शिधापत्रिकाधारकांनी आधारक्रमांक रेशन दुकानदाराला देऊनही त्यांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे ठेकेदाराने काम न करताच तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिका-यांनी त्याला चौदा लाख रूपयांचे देयक अदा केले आहे म्हणजे एकाच कामासाठी ठेकेदाराला दोन वेळा पैसे अदा करण्यात आल्यामुळे या सा-या प्रकरणात काही तरी काळबेरे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पुन्हा ठेकेदाराकरवी सदरचे काम केले जात असून, त्यासाठी सतरा लाख रूपयांची तरतूद असल्याचे सांगितले जात असताना शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक शेख हे दुकानदारांकडून पैशांची मागणी करीत असल्याची ध्वनीचित्रफित फेसबुकवर व्हायरल झाल्याने या संदर्भात शंका घेण्यास अधिक वाव निर्माण झाला आहे. मुळात आधारक्रमांक जोडण्यासाठी पुरवठा खात्याकडून रेशन दुकानदारांकडे पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार यापुर्वीच अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, सचिव महेश पाठक यांच्याकडे करण्यात आली, त्यांच्याकरवी चौकशीच्या सुचना देण्यात आल्या आहेत, परंतु पुढे काहीच झाले नाही.

 

टॅग्स :MONEYपैसाnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय