शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

भगूरची पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस  बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:39 IST

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली भगूर पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस बंद राहत असून, ती कायमस्वरूपी २४ तास उघडी ठेवून सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत येथील ग्रामस्थांनी केली आहे.

भगूर : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली भगूर पोलीस चौकी महिन्यातून पंधरा दिवस बंद राहत असून, ती कायमस्वरूपी २४ तास उघडी ठेवून सर्व प्रकारच्या तक्रारींची दखल घ्यावी, अशी मागणी भगूर, राहुरी, दोनवाडे, लहवित, वंजारवाडी, शेणीत येथील ग्रामस्थांनी केली आहे.  १६ वर्षांपूर्वी भगूर परिसरासाठी देवळाली पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस औटपोस्ट होते. ते २४ तास उघडे राहून त्यासाठी एक पोलीस उपनिरीक्षक, एक हवालदार व तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. तक्रार नोंदणीसाठी स्वतंत्र स्टेशनडायरी ठेवण्यात आली होती. या तक्रारी नोंदवून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वर्ग केली जात होती किंवा तक्रारीचे स्वरूप पाहून औटपोस्टमध्येच त्याचे निराकरण करण्यात येत होते. मात्र २४ तास पोलिसांकडून भगूर व परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली जात होती. या औटपोस्टमध्ये भगूरसह राहुरी, दोनवाडे, वडगाव पिंगळा, नानेगाव, लहवित, वंजारवाडी या गावांचा समावेश होता. नाशिक पोलीस आयुक्तालयाची निर्मितीनंतर भगूर औटपोस्ट बंद करण्यात येऊन भगूर पोलीस चौकी स्थापन झाली व तक्रार स्टेशन डायरी बंद होऊन भगूरसह परिसरातील नागरिकांना तक्रारी व अर्जफाटे देण्यासाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आली. भगूर शहरात १५ ते २० हजार लोकवस्ती असून, अनेक खेड्ड्यातील नागरिकांचे मुख्य बाजारपेठ दळणवळण संपर्क ठिकाण आहे येथे देवळाली कॅम्प ठाणेअंतर्गत भगूर पोलीस चौकी आहे ती महिन्यात साधारण १५ दिवस फक्त ३ ते ४ तास उघडी राहते. परिणामी भगूरसह पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील गोरगरीब नागरिकांना बस, रिक्षा, टॅक्सीचा खर्च करून ५ ते ६ किलोमीटर देवळाली कॅम्पला जावे लागते. त्यामुळे भगूर पोलीस चौकी कायमस्वरूपी उघडी ठेवून येथेच तक्रारीची दखल घ्यावी आणि गंभीर गुन्हाची कारवाई देवळाली पोलीस ठाण्यात वर्ग करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.भगूर पोलीस चौकी बंद राहत असल्याने परिसरात चोºयांचे प्रकार वाढले आहे तरी भगूरला स्वतंत्र पोलीस ठाणे करावे यासाठी मी मागील वर्षी निवेदन दिले तरीही दखल घेतली नाही, निदान पोलीस चौकी तरी नेहमी उघडी ठेवून नागरिकांच्या तक्रारी येथेच सोडवाव्या. - प्रेरणा बलकवडे,  जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेसकाही महिन्यांपूर्वी मी कार्यकर्त्यांसह पोलीस अधिकाºयांना भेटून भगूर पोलीस चौकी कायम बंद राहत असल्याबाबत तक्रार केली. तेव्हा भगुरात एक सहायक पोलीस निरीक्षक, हवालदार, पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. पण ते पाळले गेले नाही.  -मोहन करंजकर, नगरसेवक

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणे