शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

१४ तास चार भिंतीच्या आत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:56 IST

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) देशभर जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत १४ तास थांबणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये पोलिसांकडून कोणत्याही बळाचा वापर केला जाणार नाही; परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांना १४ तासांसाठी कोंडून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती तर आपल्या गावाकडे परतण्यासाठी परप्रांतीयांनी रेल्वेस्थानकांचा परिसर फुलून गेलेला होता.

ठळक मुद्देआज जनता कर्फ्यू : स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपा, कोरोना हटवा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) देशभर जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत १४ तास थांबणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये पोलिसांकडून कोणत्याही बळाचा वापर केला जाणार नाही; परंतु कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने नागरिकांना १४ तासांसाठी कोंडून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती तर आपल्या गावाकडे परतण्यासाठी परप्रांतीयांनी रेल्वेस्थानकांचा परिसर फुलून गेलेला होता.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभर दहशतीचे वातावरण असताना भारतात त्याला प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक ठिकाणी लोकांनी एकत्र जमू नये यासाठी विविध उपाययोजनांबरोबरच बंदी आदेशही लागू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे रविवारी (दि. २२) शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना १४ तास घराच्या चार भिंतीतच व्यतित करावे लागणार आहेत. जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार थंडावणार आहेत.देश आणि माणूस वाचविण्यासाठीच... एरव्ही कर्फ्यू हा शब्द ऐकला की, संचारबंदीसह पोलिसांकडून मिळणाºया दंडुक्यांचा मार याचे स्मरण होते. परंतु, रविवारी पाळण्यात येणाºया जनता कर्फ्यूत पोलिसी बळाचा वापर होणार नाही, की कुठेही संचारबंदी लागू केली जाणार नाही. जनतेने आपला स्वत:चा जीव जपण्याबरोबरच इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:च्या विवेकबुद्धीने पाळलेले आत्मसंयम आहे. या कर्फ्यूमुळे माणूस आणि पर्यायाने देश वाचणार असल्यासंबंधी जागृती केली जात आहे. त्यासाठी काही स्वयंसेवी संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. परप्रांतीयांची धावपळ : कोरोनामुळे देशभर सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. शहर व जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या परप्रांतीयांच्या हाताला काम उरलेले नाही. त्यामुळे परप्रांतीयांनी आपल्या गावाची वाट धरली असून, जिल्ह्यातील नाशिकरोडसह मनमाड, लासलगाव, इगतपुरी, देवळाली कॅम्प या रेल्वेस्थानकांवर गर्दी दिसून आली. जीवनावश्यक वस्तूवगळता अन्य सर्व बाजारपेठांना कुलूप लागणार असून, रस्त्यावरील रहदारीलाही ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बव्हंशी आस्थापना, व्यापारी संघटनांनी शनिवारी व रविवारी आपले व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे शनिवारीच जिल्ह्यात ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला. मात्र, जनता कर्फ्यूमुळे रविवारी बाजारपेठा बंद राहाणार आहेत. अफवांमुळे नागरिकांनी शनिवारी भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली होती. जनता कर्फ्यू हा कोणीही लादलेला कर्फ्यू नसून जनतेने जनतेच्याच सुरक्षिततेसाठी केलेला एक प्रयोग असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता १४ तास घरांमध्येच थांबून कोरोनाला थोपविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक