नांदगाव : येथील आर. टी. ओ. कॅम्प बंद केल्याने शेकडो वाहन धारकांची गैरसोय झाली असून बंद केलेला कॅम्प त्वरित सुरु करण्यात यावा अशी मागणी प्रवासी संघटनेचे भैयासाहेब चव्हाण यांनी केली आहे. कॅम्प बंद केल्याने वाहन धारकांना नोंदणीसाठी मालेगाव तालुक्यात टेहेरे येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या कार्यालयात जावे लागते. परंतु या कार्यालयात पिण्याचे पाणी, सावलीसाठी शेड किंवा इतर सुविधा नाहीत. सकाळी ११ वा. कार्यालयात गेलेल्या व्यक्तींना तीन ते चार तास आपला नंबर येईपर्यंत थांबावे लागते. नांदगाव येथे महिन्याला सुमारे २०० वाहनांची विक्र ी होत असते. शिवाय गाडीची नोंदणी झालेली नसतांना ४० किमी अंतरावर नोंदणीसाठी जात असलेल्या वाहनाला अपघात झाला तर विनाकारण नवीन समस्या उद्भवतात. जिल्ह्यात लहान गावांमध्ये आर. टी. ओ. कॅम्प होतात. या संदर्भात आर. टी. ओ. कडे निवेदन दिले आहे.
आरटीओ कॅम्प बंद केल्याने वाहनधारकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 13:10 IST