शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
अब्जाधीश असूनही पान मसाल्याची जाहिरात का? यूट्यूबर ध्रुव राठीचे शाहरुख खानला गंभीर प्रश्न; पैशांचा हिशोब सांगितला
3
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
4
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
5
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
6
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
7
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
8
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
9
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
10
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
11
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
12
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
13
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
14
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
15
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
16
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
17
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
18
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
19
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
20
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...

मायदेशी परतण्यासाठी ‘त्या’ विद्यार्थ्यांचे आर्जव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 23:34 IST

लागलेली आहे. आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे, मात्र मुंबईच्या विमानतळावर विमान उतरण्यासाठी शास्रज्ञांकडून परवानगीसाठी विलंब होत असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला साकडे : रशियात अडकले २०३ विद्यार्थी; निफाडमधील २२ जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : रशियातील किर्गिझस्तान विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोनशे तीन विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची आस लागलेली आहे. आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे, मात्र मुंबईच्या विमानतळावर विमान उतरण्यासाठी शास्रज्ञांकडून परवानगीसाठी विलंब होत असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्र्यांशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.किर्गिझस्तान येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत पिंपळगाव येथील सोनिया विवेक पाटील, तृप्ती उत्तम शिंदे, सिद्धी हेमंत खैरनार, ऋतुराज कैलास शेवकर, अनिकेत सतीश बैरागी यांच्यासह परिसरातील दहा विद्यार्थी, तालुक्यातील २२, जिल्ह्यातील ९१ तर संपूर्ण महाराष्ट्रातील २०३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे जगभरात हवाई सीमा बंद करण्यात आल्या असून, संपूर्ण भारतात लॉकडाउन आहे. किर्गिझस्तान शहरात अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याने बाहेरून आयात करावे लागते, परंतु तेदेखील लॉकडाउन काळात उपलब्ध न झाल्यास त्या विद्यार्थ्यांच्या खाण्या-पिण्याचा व आजारी पडल्यास औषधांचा तुटवडा निर्माण होऊन शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना भारतात आणण्यासाठी पालकांनी सुरेशबाबा पाटील, आमदार बनकर, माजी आमदार अनिल कदम, सुप्रिया सुळे, नीलम गोºहे, आदित्य ठाकरे व रोहित पवार यांच्यामार्फत शासनाला साकडे घातले आहे.१ मे रोजी आम्हाला एमबीबीएसची डिग्री मिळणार आहे; परंतु याठिकाणी जगणेदेखील मुश्कील झाले आहे. अन्नाचा मोठा तुटवडा आहे तसेच आजारी पडलेल्या मुलांसाठी औषधेदेखील उपलब्ध नाहीत, मग आम्ही जगणार कसे? आमच्या डिग्रीचा काय उपयोग होणार? आम्ही जगलो तर अजून पदव्या मिळू शकतील त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर मायदेशी परत न्यावे ही विनंती. - कल्पिता रसाळ, विद्यार्थिनीतेथील मुख्य शहर लॉकडाउन झाल्यामुळे खाण्या-पिण्याची गैरसोय व आरोग्य सुविधाही विद्यार्थ्यांना अपुºया पडत आहेत. त्यांना तातडीने मायदेशी घेऊन येण्यासाठी भारतीय प्रशासनाने व्यवस्था करावी. माझी पुतणी सोनिया पाटील दररोज व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्हिडीओ कॉलिंग करून जेवणाचे व तेथील परिस्थितीचे फोटो पाठवून विनवण्या करीत आहे. खूप मोठ्या संकटात ते सध्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पावले उचलून सहकार्य करणे अपेक्षित आहे.- नीलेश पाटील, पालक, पिंपळगाव बसवंत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थी