शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल वसुलीवरून वायरमनला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 18:31 IST

वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकºयाने मारहाण करून दमबाजी केल्याची घटना बागलाण तालुक्यातील खमताणे शिवारात घडली. महावितरणच्या सटाणा विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर अर्जुन खैरनार यांनी याबाबत सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी सागर वसंत जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यास अटक : खमताणे येथील घटना

सटाणा : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकºयाने मारहाण करून दमबाजी केल्याची घटना बागलाण तालुक्यातील खमताणे शिवारात घडली. महावितरणच्या सटाणा विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर अर्जुन खैरनार यांनी याबाबत सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी सागर वसंत जाधव याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.दरम्यान, या घटनेमुळे आक्र मक झालेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी बागलाणच्या तहसीलदारांना निवेदन दिले असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. बुधवारी (दि.२६) सकाळी सात वाजता महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर खैरनार हे मदतनीस रवींद्र पवार यांना सोबत घेऊन खमताणे शिवारात थकीत वीजबिल वसुलीसाठी निघाले होते. रोहिदास जाधव यांच्या शेताजवळ दोन्ही कर्मचारी आले असता तेथे उभा असलेला सागर वसंत जाधव (रा. मुंजवाड) याने तुम्ही आमचा ट्रान्सफॉर्मर का बंद केला, म्हणून वाद घातला असता भास्कर खैरनार यांनी खमताणे शिवारातील ट्रान्सफॉर्मरक्र मांक चारवरील शेतकºयांकडे थकीत वीजबिल असल्याने वरिष्ठ अधिकारी कल्याणी भोये यांच्या आदेशावरून आम्ही वीजपुरवठा खंडित केल्याचे सांगितले.तुमच्या वडिलांच्या नावे असलेले ३७ हजार ७६० रु पयांचे वीजबिल भरा, लगेच तुमचा वीजपुरवठा सुरू करतो. याचा राग आल्याने सागर जाधव याने भास्कर खैरनार यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तहसिलदाराना निवेदनआपल्या कर्मचाºयाला मारहाण झाल्याचे कळताच महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल उईके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.टी. पवार, उपअभियंता अभिजित आहिरे, सहायक उपअभियंता कल्याणी भोये, टी.बी. कापसे, कनिष्ठ अभियंता अजिंक्य जोशी, सहायक अभियंता भाऊलाल नागरे यांच्यासह महावितरणच्या सर्व युनियन व संयुक्त कृती समितीच्या कर्मचाºयांनी बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांची भेट घेऊन संबंधित मारहाण करणाºया युवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, अशा प्रकारांवर अंकुश लावण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे