पाळे पिंप्री येथे हिवाळी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 04:56 PM2020-01-02T16:56:58+5:302020-01-02T16:57:45+5:30

कळवण येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना, विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन पाळे पिंप्री येथे संपन्न झाले.

  Winter camp at Paley Pimpri | पाळे पिंप्री येथे हिवाळी शिबिर

कळवण महाविद्यालयाचे पाळे पिंप्री येथे आयोजित हिवाळी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना आमदार नितीन पवार व्यासपीठावर शशिकांत पवार, डॉ रावसाहेब शिंदे, राजेंद्र भामरे, भूषण पगार, उषा शिंदे , भरत गायकवाड, गंगाधर खांडवी आदीं. 

Next
ठळक मुद्दे कळवण - राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये समाजसेवेसाठी तत्पर असतात. त्यामुळे भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो या हेतूने राष्ट्रीय सेवा योजना उपक्र माद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवकांनी करावे. समाज


सात दिवस चाललेल्या शिबिरात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचे उदघाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष डॉ रावसाहेब शिंदे, विश्वस्त राजेंद्र भामरे, भूषण पगार, प्राचार्य उषा शिंदे सरपंच यशोदाबाई कुवर, भरत गायकवाड, गंगाधर खांडवी आदीं होते.
शशिकांत पवार यांनी सांगितले की राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह हे या उपक्र माचे स्वरूप आ िणकार्य स्पष्ट करतात. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रु जविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना हा अभिनव उपक्र म असल्याचे सांगून विद्यमान स्थितीतील घडामोडीचे विवेचन पवार यांनी यावेळी केले.
यावेळी उपप्राचार्य एन .के. आहेर, एस. एम. पगार, श्रीमती एम. व्ही. बोरसे, एम. एन. पाटील, दादाजी गांगुर्डे, रमण गायकवाड, पोपट गायकवाड दिलीप गायकवाड, हिरामण गायकवाड ,लताबाई गवळी, रंगनाथ गायकवाड, आदींसह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

Web Title:   Winter camp at Paley Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.