शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

नाशकात वाइन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 01:36 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्र सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन देतानाच विद्यापीठ १४ डिसेंबर २०१९ रोजी अधिसभेच्या बैठकीत नाशिकमध्ये वाइन टेक्नॉलॉजीचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून उपकेंद्राच्या सबलीकरणासोबतच नाशिकमधील विद्यार्थ्यांना वाइन तंत्रज्ञानातील अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध होणार असून, येथील वाइन उद्योगालाही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देउपकेंद्र सक्षमीकरणाचा प्रयत्न वाइन उद्योगाला मिळणार कुशल मनुष्यबळ

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेनाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्र सक्षमीकरणासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन देतानाच विद्यापीठ १४ डिसेंबर २०१९ रोजी अधिसभेच्या बैठकीत नाशिकमध्ये वाइन टेक्नॉलॉजीचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून उपकेंद्राच्या सबलीकरणासोबतच नाशिकमधील विद्यार्थ्यांना वाइन तंत्रज्ञानातील अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध होणार असून, येथील वाइन उद्योगालाही कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.नाशिक जिल्ह्यात गेल्या दशकभरात वाइन उद्योगाचा झपाट्याने विकास झाला असला तरी अजूनही स्थानिक पातळीवर या क्षेत्रातील मागणीनुसार तंत्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. विद्यापीठाने लवकरच नाशिक उपकें द्राच्या माध्यमातून वाइन टेक्नॉलॉजी व जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरूंनी विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत घेतल्याची माहिती अधिसभा सदस्य नंदू पवार यांनी दिली.वाइन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना स्थानिक वाइन उद्योगासोबतच शासकीय क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून, सरकारचा कृषी विभाग, आयात व निर्यात विभाग यांसह खासगी क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाइन उत्पादन कंपन्या, विनियार्ड व्यवस्थापन व विपणन सेवा, संशोधन तंत्र, तांत्रिक सहायक, वायनरी प्रयोगशाळा तांत्रिक आदी विविध पदांसह वाइन उद्योगातील गुणवत्ता नियंत्रक म्हणूनही या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्वत:ची वाइनरी सुरू करणे, वाइनरी सल्लागार वाइन उत्पादक अथवा वाइन परीक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना स्वत:चा उद्योग व्यवसायही सुरू करणे शक्य होऊ शकते. त्यामुळे कुलगुरूंनी घोषणा केली असली तरी हा अभ्यासक्रम प्रत्यक्षात कधी सुरू होणार याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.प्रवेशासाठी पात्रतावाइन टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अथवा दहावीनंतर कृषी अथवा फळप्रक्रिया, वाइन टेक्नॉलॉजी, फलोत्पादन अभ्यासक्रमाची पदविका संपादन केलेल्या विद्यार्थांनाच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शंभर गुणांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार असून, बारावी किंवा बारावीच्या समांतर परीक्षेत किमान ५० टक्के गुण संपादन करणे आवश्यक आहे.

टॅग्स :NashikनाशिकPune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षण