नांदूरवैद्य : क्रि डा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत कुस्ती क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील भरविर बुद्रुक विद्यालयाच्या पवन भाऊसाहेब ढोन्नर याने प्रथम क्र मांक पटकावला. त्याची धुळे येथे होणाºया विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.याा स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. पवनने १७ वर्षाखालील ४८ किलो वजनीगटात भरविहीर बुद्रुक या शाळेकडून प्रतिनिधीत्व करत दैदिप्यमान कामगिरी केली आहे.पवनने दिल्ली येथील स्पर्धेत अव्वलस्थान पटकावत विशेष कामगिरी केली असून त्याने अनेक शालेय स्पर्धेतून प्रतिनिधीत्व करीत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. यावेळी मुख्याध्यापक सी. बी. रु पवते, क्रि डा शिक्षक कासार नाशिक जिल्हा कुस्ती तालीम संघाचे अध्यक्ष अॅड. गोरखनाथ बलकवडे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विशाल बलकवडे आदींसह सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पवन ढोन्नर अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 18:58 IST
नांदूरवैद्य : क्रि डा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत कुस्ती क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील भरविर बुद्रुक विद्यालयाच्या पवन भाऊसाहेब ढोन्नर याने प्रथम क्र मांक पटकावला. त्याची धुळे येथे होणाºया विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पवन ढोन्नर अव्वल
ठळक मुद्देनांदूरवैद्य : धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड