विंचूरला द्राक्षबागेवर कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:47 PM2019-12-15T23:47:23+5:302019-12-16T00:27:39+5:30

अवकाळी पावसामुळे येथील द्राक्षबागांना मोठा फटका बसलेला असतानाही काही द्राक्षपीक हाती लागेल म्हणून द्राक्षबागेवर कर्ज काढून लाखोंचा खर्च करूनही एक्सपोर्टची द्राक्षे कुजल्याने अखेर येथील गोरख दरेकर या शेतकऱ्याने उद्विग्न होत सुमारे दीड एकर द्राक्षबागेवर कुºहाड चालवून बाग तोडून टाकला.

Winch on a vineyard | विंचूरला द्राक्षबागेवर कुºहाड

विंचूरला द्राक्षबागेवर कुºहाड

Next
ठळक मुद्देरोगराईमुळे बहुतांशी शेतकऱ्यांची द्राक्षे कुजली

विंचूर : अवकाळी पावसामुळे येथील द्राक्षबागांना मोठा फटका बसलेला असतानाही काही द्राक्षपीक हाती लागेल म्हणून द्राक्षबागेवर कर्ज काढून लाखोंचा खर्च करूनही एक्सपोर्टची द्राक्षे कुजल्याने अखेर येथील गोरख दरेकर या शेतकऱ्याने उद्विग्न होत सुमारे दीड एकर द्राक्षबागेवर कुºहाड चालवून बाग तोडून टाकला.
अवकाळीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसानंतर द्राक्षबागांवर विविध रोगराईमुळे बहुतांशी शेतकऱ्यांची द्राक्षे कुजली आहेत. अशातच थोडाफार उरलेला द्राक्षबाग किमान खर्च झालेला पैसा वसूल करून देईल अशा आशेने शेतकºयांनी उरलेल्या द्राक्षपिकांवर अतोनात खर्च करून विविध औषधांची फवारणी करत आहेत. येथील गोरख दरेकर या युवा शेतकºयाने एप्रिल छाटणीपासून तर आॅक्टोबर छाटणीपर्यंत दोन लाखांच्यावर खर्च केला, मात्र औषधांचा मारा करूनही द्राक्षे कुजत असल्याने कर्ज काढून गुंतविलेले भांडवलही निघणार नसल्याने अखेर या युवा शेतकºयाने उद्विग्न होऊन द्राक्षबागेवर कुºहाड चालवून संपूर्ण द्राक्षबाग तोडून टाकली आहे. अतिवृष्टीमुळे फुलोरा अवस्थेत असलेली बाग कुजल्याने मोठे नुकसान झाले आहे. गोरख दरेकर यांच्यावर विविध बॅँकांचे सुमारे बारा लाखांच्यावर कर्ज असून, कर्जाचे हप्ते तसेच पुढील नियोजन कसे करावे असा प्रश्न या शेतकºयाच्या पुढे उभा ठाकला आहे.

Web Title: Winch on a vineyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.