शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी 1 मेपासून शेतकरी सन्मान यात्रा- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 19:59 IST

'शेतकऱ्यांना सरकारविषयी विश्वास वाटत नाही'

नाशिक : खचलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी सन्मान यात्रा काढणार आहे. 1 मेपासून  मराठवाडा व पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमधून ही यात्रा काढली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्यानं त्यांना धीर देण्यासाठी यात्रांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली.  नाशिक येथील हुतात्मा स्मारकाजवळ झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असून, देशात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांना आत्महत्येच्या विचारातून परावृत्त करण्यासाठी १ मे पासून मराठवाडा व पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमधून शेतकरी सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. मंत्रालयात प्रवेश करून आत्महत्या करणारे धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या विखरण गावातून या सन्मान यात्रेला प्रारंभ होणार आहे. धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी सन्मान यात्रेची सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी शहादा येथे मुक्काम व पुढे जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, वाशिम, नांदेड, परभणी, जालना, लातूर असा प्रवास करून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोण येथे पोहोचल्यानंतर शेतकरी सन्मान यात्रेचा ९ मे रोजी समारोप होणार आहे. आत्महत्या करणारे शेतकरी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावानं चिठ्ठी लिहून आणि स्वत:चं सरण रचून आत्महत्या करत आहेत. यावरून शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास उरला नसल्याचं स्पष्ट होत असून, त्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचलं असल्याचंही शेट्टी म्हणाले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी