शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मी राज्यातील राजकारणात बदल करण्याची क्षमता बाळगून, गटबाजी करणाऱ्यांना 'शिंदेस्टाइल' इंगा दाखवणार; एकनाथ शिंदे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:46 IST

नाशिक महापालिकेच्या उपमहापौर नियुक्तीवर वाद उफाळला. त्यानंतर मंगळवारी (१० फेब्रुवारी) रात्री ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोजक्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. 

"मी पक्षासाठी जीव काढतोय; परंतु येथे गटबाजी करू नका. राज्यातील राजकारणात बदल करण्याची क्षमता बाळगून आहे. नाशिकचे काय घेऊन बसलात?", असा सवाल करीत शिंदेसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नगरसेवक आणि काही मोजक्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत तंबी दिली. राजकारण केले तर नाशिकवर फुली मारीन, असे सांगतानाच संघटनात्मक बदलाचे सूतोवाच केले.

उपमहापौर नियुक्तीवर वाद उफाळल्यानंतर मंगळवारी (१० फेब्रुवारी) रात्री ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुहास कांदे आणि पक्षाचे सचिव राम रेपाळे यांनी प्रत्येक नगरसेवकाशी बंद खोलीत चर्चा केली. त्यांनतर गटबाजीवरून सर्वांनाच कडक शब्दांत समज दिली.

पक्षात कोणीही आपल्या भ्रमात राहू नये, पक्ष मोठा आहे. मी ठरवले तर नाशिकवर फुली मारू शकतो, असे सांगून त्यांनी नाशिकमध्ये यापुढे परस्पर कोणत्याही प्रकारच्या घोषणा करणार नाही तसेच कोणावर अन्याय होणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, गटनेते अजय बोरस्ते, उपमहापौर विलास शिंदे, प्रवीण तिदमे उपस्थित होते.

आधी कोअर कमिटी; नंतर थेट शिंदे घेतील निर्णय

कोणत्याही पदासाठी आधी स्थानिक पातळीवरील कोअर कमिटी इच्छुकांची नावे पक्षाचे सचिव राम रेपाळे यांच्याकडे पाठवील. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नावे देतील आणि त्यानंतर एकनाथ शिंदे अंतिम नावे कळवतील.

ज्याचे काम चांगले, त्यालाच संधी शिंदेसेनेत गटबाजी चालणार नाही, आपसांतील गटबाजीला पूर्णविराम द्यावा, असा संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ज्यांचे काम चांगले, परिणामकारक आणि जनतेला दिलासा देणारे असेल त्यांनाच पुढील काळात अधिक संधी दिली जाईल. कामाच्या आधारेच मूल्यमापन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

उपमहापौरपद सव्वा वर्षाचे, गटनेता एक वर्ष?

पक्षात अनेकजण इच्छुक होते, उपमहापौरपदावरून मतभेद झाले असले आता सर्वांना संधी मिळेल अशा पद्धतीने नियोजन करण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे सचिव राम रेपाळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. काही ठिकाणी महापौर-उपमहापौर सव्वा वर्ष करण्यात येणार आहे. नाशिकलाही त्याच धर्तीवर प्रयोग करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde Warns Factionalism, Promises 'Shinde-Style' Change in Maharashtra Politics

Web Summary : Eknath Shinde cautioned against factionalism within his party, asserting his ability to reshape Maharashtra politics. He warned against internal strife in Nashik and hinted at organizational changes, emphasizing merit-based opportunities and promising fair treatment for all.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNashikनाशिक