शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 23:28 IST

पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या लूटमारीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या असून खरेदी किमतीत शेतकऱ्यांना चोवीस तासांच्या आत पैसे देणे बंधनकारक आहे. तरीही शेतकऱ्यांची लूटमार सुरूच ठेवल्यास संबंधित आडतदार व व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करू, असा इशारा बाजार समितीचे सभापती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिला.

ठळक मुद्दे शेतकरी व आडतदार-व्यापारी प्रतिनिधींच्या समन्वय बैठक

पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या लूटमारीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या असून खरेदी किमतीत शेतकऱ्यांना चोवीस तासांच्या आत पैसे देणे बंधनकारक आहे. तरीही शेतकऱ्यांची लूटमार सुरूच ठेवल्यास संबंधित आडतदार व व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करू, असा इशारा बाजार समितीचे सभापती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिला.ओझरचे आशिष शिंदे या टोमॅटो उत्पादक युवा शेतकऱ्याच्या फेसबुक लाईव्ह तक्रारीनंतर बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी व आडतदार-व्यापारी प्रतिनिधींच्या समन्वय बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपसभापती दीपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे, सोहनलाल भंडारी, शंकरशेठ ठक्कर, नारायण पोटे, सचिव बाळासाहेब बाजारे आदी उपस्थित होते.निफाडसह इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या लूटमारीच्या व्यथा आमदार दिलीप बनकर यांच्यासमोर मांडल्या. सभापती आमदार बनकर यांनीही मी सदैव शेतकऱ्यांसोबत असून यापुढे व्यापाऱ्यांच्या तक्रारी आल्यास थेट परवाने रद्द करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. गोदाकाठच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडत यापुढे शेतकऱ्यांची लूटमार सुरूच राहिल्यास शिवसेना स्टाईलने व्यापाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशारा यावेळी दिला. पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, युवासेनेचे आशिष शिंदे, देवेंद्र काजळे, प्रकाश वाटपाडे, योगेश कुयटे, प्रवीण जगताप, भाऊ घुमरे यांनीही शेतकऱ्यांच्या तीव्र भावना यावेळी मांडत कारवाईची मागणी केली. व्यापाऱ्यांच्यावतीने सोहनलाल भंडारी यांनी भूमिका मांडली. आडत प्रतिनिधी सुभाषनाना होळकर, सुरेश खोडे, सोमनाथ निमसे, नंदू गांगुर्डे, अरुण चव्हानके यांनीही चर्चेत भाग घेतला. यावेळी बैठकीस विजय गवळी, शैलेंद्र वाळुंज, बाळासाहेब वाघ, संदीप तिडके, गंगाराम चौधरी, भाऊ घुमरे, योगेश कुयटे, रणजित वाघ, राहुल वाघ, दौलत वाघ, माधव बनकर, कुमार जाधव, संदिप साबळे, दादा महाले, संजय पवार, राहुल हरीश बोरस्ते, प्रमोद बोरस्ते, शेखर जाधव, योगेश तक्ते, शरद जाधव-वडनेर, संजय पवार राहुड आदीसह टोमॅटो उत्पादक मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :MLAआमदारMarketबाजार