शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

किमान हजार किन्नरांचे पुनर्वसन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:18 IST

निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० किन्नरांचे आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन करणार असल्याचा निर्धार उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बी. के. बर्वे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देबर्वे । मुंबईत तृतीयपंथीयांचा महामेळावा घेण्याचा निर्धार

नाशिक : निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केला, अशा तृतीयपंथीयांना आपण माणुसपणाची वागणूक देऊन साथ दिली पाहिजे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयास करणे आवश्यक आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत मुंबईत किन्नरांचा महामेळावा घेण्याबरोबरच किमान १००० किन्नरांचे आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन करणार असल्याचा निर्धार उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बी. के. बर्वे यांनी व्यक्त केला.मंगलमुखी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने आयोजित आदर्श समाजसेवा पुरस्कार आणि मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, तहसीलदार राजश्री अहिरराव, अनिता डांगळे, अतुल निकुंभ आणि संस्थेच्या अध्यक्ष पायलगुरू गवारे उपस्थित होते. यावेळी बोलताना बर्वे यांनी डॉ. आंबेडकर यांनी गावकुसाबाहेर राहणाऱ्यांना माणूस बनवून मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. तसेच तृतीयपंथीयांनादेखील मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे अ‍ॅड. बर्वे यांनी नमूद केले. यावेळी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी पायलगुरू यांच्या संकल्पनेनुसार नाशिकमध्ये किन्नरांसाठी आश्रम आणि वृद्धाश्रम स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाने तृतीयपंथीयांची मतदार म्हणून नोंदणी करणे तसेच तृतीयपंथीयांनादेखील निराधार योजनेत पेन्शन सुरू करण्याचे पाऊल उचलून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने पावले टाकली असल्याचे नमूद केले. यावेळी राजेंद्र कलाल यांच्या हस्ते आदर्श समाजसेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पायलगुरू गवारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले....तर तुम्ही देशद्रोहीजन्मत:च निसर्गाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. निसर्गाने तुम्हाला पुरुष किंवा स्त्री बनवून न्याय केला म्हणून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांना तुम्ही लांब करणार असाल तर तुम्ही समाजद्रोही आणि देशद्रोही आहात. कारण किन्नरदेखील या समाजाचेच आणि देशाचेच घटक असल्याचेही अ‍ॅड. बर्वे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकLGBTएलजीबीटी