शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रासाकाचा बॉयलर यंदा तरी पेटणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 21:56 IST

काकासाहेबनगर : कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या रानवड सहकारी साखर कारखान्यामागचे गेली काही वर्षे सुरू असलेले शुक्लकाष्ठ काही संपत नसल्याने दोन वर्षांपासून बंद असलेला रासाकाचा बॉयलर कधी पेटणार? हा सवाल अनुत्तरित आहे. लालफितीच्या कासवगतीने सुरू असलेल्या कारभारामुळे कामगार व ऊस उत्पादकांना मागील दोन वर्षाप्रमाणे चालू गळीत हंगाम बंद राहतो की काय? अशी भीती रानवड परिसरात निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देतारीख पे तारीख : शुक्लकाष्ट संपता संपेना, गळीत हंगाम सुरू होण्याबाबत साशंकता

लोकमत न्यूज नेटवर्ककाकासाहेबनगर : कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या रानवड सहकारी साखर कारखान्यामागचे गेली काही वर्षे सुरू असलेले शुक्लकाष्ठ काही संपत नसल्याने दोन वर्षांपासून बंद असलेला रासाकाचा बॉयलर कधी पेटणार? हा सवाल अनुत्तरितआहे. लालफितीच्या कासवगतीने सुरू असलेल्या कारभारामुळे कामगार व ऊस उत्पादकांना मागील दोन वर्षाप्रमाणे चालू गळीत हंगामबंद राहतो की काय? अशी भीती रानवड परिसरात निर्माण झाली आहे.मार्च महिना उजाडला तरी साखर आयुक्तांनी रासाकाची भाडेपट्टा निविदा अजून काढली नसून २१ नोव्हेंबर २०१९ रोजी दहा दिवसांची निविदा काढण्यात आली. ३० नोव्हेंबरपर्यंत आॅनलाइन निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी महाराष्ट्रात जाहिरात दिली गेली.सुरक्षानिविदा उघडण्याची ३ डिसेंबर तारीख होती. नंतर साखर आयुक्त पुणे साखर संघ व प्रादेशिक साखर अहमदनगर व रासाका अवसायक विभागाच्या कारभारामुळे सदर निविदा निघू शकल्या नाही व नंतर आचारसंहिताचा बागुलबुवा करीत रासाका टेंडर प्रक्रिया स्थगित करण्यात आली, परंतु मार्च उजाडला तरी रासाकासाठी निविदा भरण्याचे टेंडर कधी निघते व कोणाच्या निविदा आल्या यासाठी कामगार व ऊस उत्पादक शेतकरी डोळ्यात तेल घालून बघत आहे, परंतु भाडेपट्टा निविदांबाबत प्रशासनाची भूमिका समजत नसल्याने तालुक्यातील रासाकावर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांच्या चिंतेत भर पडली आहे.चालू गळीत हंगाम साखर संघ म्हणा की, शासनाच्या उदासीन धोरणामुळे अजूनही अडखळत आहे, परंतु याचा परिणाम कामगार ऊस उत्पादक शेतकरी व स्थानिक व्यावसायिकांची आर्थिकदृष्ट्या कोंडी होऊन नागरिक कर्जबाजारी झाले आहे.- एल. जी. वाघ, माजी कार्यकारी संचालक, रासाकारासाका हा दोन वर्षांपासून बंद झाल्याने व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालवली तर चालू गळीत हंगाम सुरू होईल या आशेवर परिसरातील व्यावसायिक होते, परंतु मागील शासनाप्रमाणे या शासनाचाही अनुभव वाईट येत आहे.- विश्वनाथ जाधव, व्यावसायिक, रासाका कार्यस्थळ.दिस येतील, दिस जातील, भोग सरलं असं वाटत होतं, परंतु तारीख पे तारीख व लालफितीचा उदासीन कारभार याच्यामुळे रासाका बंद आहे. कोट्यावधी रुपये थकीत आहे म्हणून तालुक्यातील भूमिपुत्र तथा लोकप्रतिनिधी म्हणून शासनाने रासाका आमदार दिलीप बनकर यांच्या ताब्यात दिल्यास रासाकाला अच्छे दिन येतील.- बळवंतराव जाधव, अध्यक्ष, रासाका कामगार संघटना

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेnifadनिफाड