शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न कोरोनाकाळात तरी सुटतील?

By संजय पाठक | Updated: September 25, 2020 01:46 IST

नाशिक शहरात कोरोनामुक्तीसाठी माझे कुटुूंब माझी सुरक्षा राबविण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात घरोघर फिरणा-या अंगणवाडी सेविकांनी त्यास विरोध केला आहे. त्यांच्या अडचणी अनंत असून मुख्य प्रश्न सुरक्षीततेचा आहे त्यामुूळे आता मोहिमेत सहभागी न होण्याचा इशारा देऊन ऐन कोरोना काळात तरी त्यांचे प्रश्न सुटतील काय हा प्रश्न आहे.

 नाशिक- कोणतीही शासकिय योजना किंवा मोहिम यशस्वी करायची असेलतर त्याचे यशापयश हे वरीष्ठ पातळीपेक्षा कनिष्ठ पातळीवर अवलंबून असते.सध्या नाशिक शहरात कोरोनामुक्तीसाठी माझे कुटुूंब माझी सुरक्षाराबविण्यास सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्षात घरोघर फिरणा-या अंगणवाडीसेविकांनी त्यास विरोध केला आहे. त्यांच्या अडचणी अनंत असून मुख्य प्रश्नसुरक्षीततेचा आहे त्यामुूळे आता मोहिमेत सहभागी न होण्याचा इशारा देऊन ऐनकोरोना काळात तरी त्यांचे प्रश्न सुटतील काय हा प्रश्न आहे.  नाशिक शहरात सुमारे साडे चारशे अंगणवाड्या महापालिका चालवते. त्यासाठीसाडे  सातशे अंगणवाडी सेविका आहेत. अवघ्या चार हजार रूपये मानधनावर त्याकाम करतात. अवघ्या तीन ते चार तासाचे काम दिवसभरात करणे म्हणजे कोणालाखूप सोपे काम वाटेल परंतु स्थिती तशी नाहीये. अंगणवाडीतील मुलांच्यासांभाळ आणि पोेषण आहारापालिकडे या सेविकांकडे अनेक कामांच्या जबाबदाºयाटाकल्या जातात. जनगणना, आरोग्य सर्वेक्षणापासून निवडणूकीपर्यंत अनेक कामेकरायला सांगितली जातात. ही कामे सांगताना सेविकांचे शिक्षण  आणि अन्यविषय विचारात घेतली जात नाही. शासनाची कोणतीही योजना आली की महापालिकेलासाडे सातशे कर्मचाºयांची फौज जमेची बाजू वाटते मात्र, त्यांचे प्रश्नसोडविणे किंवा लाभ देण्याची वेळ आली की प्रशासन मागे हटते.    सध्या कोरोनाचा काळ आहे आणि आता राज्य शासनाच्या संकल्पनेतून माझेकुटुूंब मोहिम राबताना घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणाची जबाबदारी यामहिलांवर सोपविण्यात आली आहे. त्यांना  केवळ मास्क आणि कॅप तसेच हँडग्लोजएवढीच सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. तसेच आॅक्सिमीटर आणि थर्मल गनसोपविण्यात आली आहे. परंतु त्यासाठीचे किमान वैद्यकिय ज्ञान देण्यातआलेले नाही. त्यातच घरोघर ंजाऊन संकलीत केलेली माहिती मोबाईल अ‍ॅपमध्येभरायची आहे,परंतु ६० टक्के सेविकांकडे अ‍ॅँड्रॉईड मोबाईल सुध्दा नाही.विशेष म्हणजे घरोघर सर्वेक्षण करताना एखादा कोरोना संसर्ग बाधीत व्यक्तीआढळला तर त्यातून या महिलांना संसर्ग होऊ शकतो. त्याची जोखीम पण आहेपरंतु या महिलांसाठी ना पीपीई कीट आहे, ना वैद्यकिय विमा! त्यातच ब-याचमहिला पन्नास वर्षांपेक्षा वयाने जास्त आहेत. काहींना मधुमेह,उच्चरक्तदाब आणि काहींना हृदय विकार देखील आहे त्यांची जबाबदारी कोणीस्विकारायची?   मध्यंतरी एका खासगी वैद्यकिय महाविद्यालयाच्या अर्सेनिक अल्बम गोळ्यावाटपाचे काम या महिलांना देण्यात आले. त्यात अनेक महिलांना संसर्ग झालापरंतु त्याची दखल प्रशासनाने कितपत घेतली? जीव धोक्यात घालण्याचे हेकामही अवघ्या चार हजार रूपयांत  करायचे आहे. महापालिकेने  खासगी कर्मचारीनेमले तर चार हजार रूपयांत ते  तरी काम करण्यास तयार होतील काय हा प्रश्नआहे.  योग्य वेळी मागण्या पुढे  रेटल्या तर त्यातून काही फलनिष्पती होईलया अपेक्षेने त्यांनी मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे,मात्रकोरोना काळात त्यावर तोडगा निघणे जवळपास अशक्यच आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या