शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

निवडणूक लढणार, पक्षचिन्हाचा पत्ताच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:41 IST

विधानसभा निवडणूक लढायची तर आहे; परंतु पक्ष उमेदवारी देईल किंवा नाही याचा पत्ता नाही, उमेदवारी नाही मिळाली तर पक्षांतर करायचे किंवा अपक्ष निवडणूक लढवायचीच आहे.

नाशिक : विधानसभा निवडणूक लढायची तर आहे; परंतु पक्ष उमेदवारी देईल किंवा नाही याचा पत्ता नाही, उमेदवारी नाही मिळाली तर पक्षांतर करायचे किंवा अपक्ष निवडणूक लढवायचीच आहे. अशा कुंपणावरील इच्छुकांनी अजब शक्कल लढविली आहे. त्यांनी पक्षाच्या नेत्याच्या छबीपेक्षा कुटुंबातील राजकीय वारसा दाखवण्यासाठी अशा कुटुंबातील व्यक्तिंच्याच छबी प्रचारपत्रकांवर छापल्या आहेत.नाशिक शहरात यंदा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरे फारशी झाली नसली तरी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र पक्षांतरे वाढणार आहेत. त्याची चाहुल मात्र आत्ताच लागली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी कधी नव्हे इतकी इच्छुकांची संख्या वाढली आहे. निवडणूक लढवायचीच या इराद्याने प्रचारात अनेक जण इच्छुक असून त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल याची खात्री नाही. पूर्व नाशिकमधील एका इच्छुकाची तर भलतीची अडचण झाली आहे.मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे आणि आपल्या पिताश्रींचे चित्र वापरून या उमेदवाराने प्रचारपत्रकेही छापली. परंतु नंतर राज ठाकरे यांनी निवडणूक लढवायची नाही असे ठरविले. त्यामुळे या इच्छुकाने त्यांची छबी गायब करून पत्रके छापली आणि त्याचे वितरण सुरू केले. आता राज यांनी निवडणूक लढवायची, असा निर्णय घेतल्यानंतर मात्र संबंधितांनी पुन्हा राज यांची छबी वापरण्यास प्रारंभ केला आहे.राजकीय वारसासाठी माता-पित्याची छबीनाशिक पश्चिममधील एका राज्यस्तरीय पक्षाच्या इच्छुकाने अनेक पक्षांतरे केल्यानंतर राष्टÑवादीकडे उमेदवारी मागितली खरी; परंतु पक्षाची भूमिका स्पष्ट होत नाही. त्यामुळे या इच्छुकाने आपला राजकीय वारसा सांगण्यासाठी माता-पित्यांच्या छबींचा वापर सुरू केला आहे.पक्षाने उमेदवारी दिली, तर ठीक नाही तर अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे संबंधित कार्यकर्ते सांगत आहेत, तर अन्य काही इच्छुकांनी पक्षाने उमदेवारी न दिल्यास अन्य पक्षांकडून निवडणूक लढवायची असे सांगून त्यावर पक्षचिन्हच प्रसिद्ध केलेले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसnashik-pcनाशिक