शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

सीईओंच्या बदलीमुळे आता नाशिक स्मार्ट होईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST

अर्थात, कंपनीकरण हेच खरे तर वादाचे मूळ ठरले आहे. महापालिकेचे कायदे आणि कार्यपद्धती तसेच स्मार्ट सिटी कंपनीचे कायदे आणि ...

अर्थात, कंपनीकरण हेच खरे तर वादाचे मूळ ठरले आहे. महापालिकेचे कायदे आणि कार्यपद्धती तसेच स्मार्ट सिटी कंपनीचे कायदे आणि कार्यपद्धती अत्यंत भिन्न आहे. महापालिकेत नगरसेवक कामे सुचवतात. ते इस्टीमेट तयार करण्यापासून ते टेंडर मंजूर होईपर्यंत सर्व काही प्रक्रिया नगरसेवकांच्या समक्ष होत असते, परंतु कंपनीत मात्र असते नसतेच. त्यामुळेच खऱ्या गोंधळाला सुरुवात झाली. महापालिकेप्रमाणे कंपनीकडून काहीच माहिती मिळत नाही म्हणजे विश्वासात घेतले जात नाही असा आरोप होऊ लागला. कंपनीचे परस्पर होणारे निर्णय आणि ज्यादा दराच्या निविदा या सर्व प्रकारांतच सर्वाधिक भर पडली ती सीईओ प्रकाश थवील यांच्या स्वभावाची! उपजिल्हाधिकारी संवर्गातून आलेल्या या अधिकाऱ्याने आपण कंपनीचे सीईओपद हे महापालिकेसारख्या अंगीकृत संस्थेचे आणि ते तात्पुरते आहे, याची जाणिव राहिल्याचे त्यांच्या वर्तनातून दिसले नाही. स्वभावात लवचिकता नसल्याने त्यांचे संचालकांबरोबर खटके उडणे स्वाभाविक होते. कंपनी ॲक्टच्या नावाखाली त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादाला कारणीभूत ठरले. स्मार्ट रोडच्या ठेकेदाराला दिलेल्या दंडमाफीपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेले जलमापक म्हणजेच स्काडा मीटर बसवण्याच्या अडीशचे कोटींच्या निविदेतील परस्पर केलेले बदल वादात सापडल्यानंतर त्यांनी हे सर्व बदल कंपनीचे अध्यक्ष आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले आणि वादाला वेगळे वळण मिळाले. कुंटे यांच्यावर संशयाची सुई गेल्यानंतरही त्यांनी ज्या पद्धतीने थवील यांच्यावर पांघरूण घातले, ते बघता कुंटे हेच त्यांचे तारणहार असे आरोप होत राहिले. अगदी गेल्यावर्षी थवील यांची बदली होऊनही ते याच कंपनीत राहिल्यामुळे त्यांच्यावर कोणाचातरी वरदहस्त आहे, हे उघड झाले.

ज्या पक्षाच्या शीर्ष नेत्याने ही याेजना आखली त्याच पक्षाचे महापौर आणि पदाधिकारी केवळ एका अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण योजनाच गुंडाळण्याची भाषा करण्याची बाब करत असतील तर ही बाब गंभीर होती. राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असतानाही त्यावर तोडगा काढणे या संचालकांना पाच वर्षांत शक्य नसेल तर त्याचा दोष कोणाला द्यायचा? स्मार्ट सिटीची आजची ‌स्थिती अत्यंत वेगळी आहे. ४९४ कोटी रुपयांचा निधी हाती पडूनही केवळ १५३ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. तर ४४५ कोटी रुपयांना अजून हातही लागलेला नाही. जी कामे पूर्ण झाली ती मुळात वादग्रस्त आहेत, जी कामे कार्यवाहीत आहेत, तीही निर्धोकपणे चालू आहेत,असे नाही. सर्व कामांना याच संचालकांनी मंजुरी देऊनही प्रत्येक काम वादग्रस्त झाले आणि त्याचे खापरही सीईओंवर फोडून झाले. आता त्यांच्या बदलीनंतर खऱ्या अर्थाने सर्व कामांतील दोष सुधारून नाशिक स्मार्ट होणार असेल तर याही निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे.

- संजय पाठक