शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य आज ठरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:34 IST

नाशिक : गेल्या एक मेपासून आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचारी ‘समान काम, समान दाम’ या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले असून, आजवर आठ कर्मचाºयांची प्रकृती खालावली असतानाही विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने याप्रकरणी आता पोलीस आयुक्त मध्यस्थाची भूमिका बजविणार आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची याप्रकरणी चर्चा झाल्यानंतर ...

नाशिक : गेल्या एक मेपासून आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचारी ‘समान काम, समान दाम’ या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले असून, आजवर आठ कर्मचाºयांची प्रकृती खालावली असतानाही विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने याप्रकरणी आता पोलीस आयुक्त मध्यस्थाची भूमिका बजविणार आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची याप्रकरणी चर्चा झाल्यानंतर विद्यापीठाला आवश्यक तो निर्णय घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान रविवारी आणखी एका कर्मचाºयाला रूग्णालयात दाखल करण्यात आले.  अर्थात विद्यापीठाकडून सातत्याने याप्रकरणी पळवाट शोधली जात असल्याने प्रशासनाची दिशाभूल करणाºया संबंधिताना जिल्हाधिकाºयांनीच ताकीद दिली पाहिजे, अशी अपेक्षा आंदोलनकर्ते कर्मचारी व्यक्त करीत आहेत.  आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाºयांनी ‘समान काम, समान दाम’ या मागणीबरोबरच निलंबित कर्मचाºयांसह सर्व कंत्राटी कामगारांना सेवेत घेण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून संघर्ष करीत आहेत. विद्यापीठात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अवघ्या पाच ते सहा हजार रुपयांवर काम करणाºया कर्मचाºयांना त्यांच्या कामाचा पुरेसा मोबदला आणि अपेक्षित भत्ते मिळत नसल्याने कर्मचाºयांनी आवाज उठविला आहे. सदर प्रकरणी विद्यापीठाची कंत्राटी नऊ कर्मचाºयांना कामावरून काढून टाकल्याने सर्वच कंत्राटी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात अनेकदा चर्चा झाली मात्र विद्यापीठाने कंत्राटी कर्मचाºयांना कोणतीही हमी न दिल्याने कर्मचाºयांनी निषेध व्यक्त करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे.  गेल्या पाच महिन्यांपासून कंत्राटी कर्मचारी विद्यापीठासमोर उपोषणाला बसलेले आहेत. मात्र एकदाही विद्यापीठाकडून कुणीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. याउलट पोलिसांना बोलावून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही कर्मचाºयांना पोलीस म्हसरूळ पोलीस ठाण्यातही घेऊन गेले होते. आंदोलनाच्या जागेवर विद्यापीठाने हरकतही घेतली होती. विद्यापीठ सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून दबाव निर्माण करीत असल्याची तक्रारही कर्मचाºयांकडून होत आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारी