शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत कांदा विक्र ीचे मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 17:30 IST

देवळा : देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विकलेल्या कांद्याचे पैसे चोवीस तासांच्या आत रोखीने देण्याचा निर्णय बुधवारपासून (दि. २)घेण्यात आला असून शेतकºयांना रोखीने पैसे देणे ज्या व्यापाºयांना शक्य असेल त्यांनीच लिलावात भाग घ्यावा अशी ताकीद व्यापाºयांना देण्यात आली असल्याची माहिती बाजार समितीचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली आहे. यामुळे कांदा विक्र ी केल्यानंतर रोख पेमेंट देण्याचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आता कायमचा मार्गी लागला असून शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकेदा आहेर:ज्या व्यापाऱ्यांना शक्य असेल त्यांनीच लिलावात भाग घेण्याच्यासुचना

देवळा : देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विकलेल्या कांद्याचे पैसे चोवीस तासांच्या आत रोखीने देण्याचा निर्णय बुधवारपासून (दि. २)घेण्यात आला असून शेतकºयांना रोखीने पैसे देणे ज्या व्यापाºयांना शक्य असेल त्यांनीच लिलावात भाग घ्यावा अशी ताकीद व्यापाºयांना देण्यात आली असल्याची माहिती बाजार समितीचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली आहे. यामुळे कांदा विक्र ी केल्यानंतर रोख पेमेंट देण्याचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आता कायमचा मार्गी लागला असून शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.शेतकºयाने कांदा विक्र ी केल्यानंतर व्यापारी त्यांचे शेतकºयांशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांचा लाभ घेऊन कांद्याचे पैसे देण्यात दिरंगाई करत असल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्याचा देवळा बाजार समितीत येणाºया कांद्याच्या आवकवर विपरीत परीणाम होऊ लागला होता. व्यापारी रोख पेमेंट देत नसल्यामुळे देवळा परीसरातील शेतकरी देवळा मार्केट सोईचे असतांना नाईलाजाने आपला कांदा विक्र ीसाठी उमराणा, चांदवड, वणी, कळवण, पिंपळगाव आदी बाजार समित्यांमध्ये नेऊ लागले. याचा देवळा शहरातील व्यापार उद्योगांवर देखील परीणाम झाला. कांदा विक्र ीचे पैसे शेतकºयांनी रोख घ्यावेत अशी सुचना बाजार समितीमार्फत नियमीतपणे ध्वनिक्षेपकावरून करण्यात येऊनही रोख पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते.दि. ३१ आॅगस्टरोजी बाजार समितीच्या सभागृहात सभापती आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ व कांदा व्यापाºयांची बैठक घेण्यात आली. यावेळी शेतमाल विक्र ीनंतर शेतकºयांना चोवीस तासाच्या आत पैसे देण्याबाबत व्यापाºयांशी चर्चा करण्यात आली. शेतकºयांना कांदा विक्र ीचे पैसे चोविस तासाच्या आत देणे ज्या व्यापाºयांना शक्य असेल त्यांनीच लिलावात सहभागी व्हावे तसेच कांदा पेमेंटबाबत शेतकºयांची तक्र ार आल्यास संबंधित व्यापाºयाला १५ दिवस लिलावात भाग घेता येणार नाही आदी महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले.यावेळी बाजार समितीचे उपसभापती रमेश मेतकर, बापू देवरे,रमेश ठुबे, अमोल आहेर, धनंजय देवरे, दिपक गोसावी, महेंद्र देवरे, सुनिल देवरे, भिला ठुबे, राहुल लुंकड, मुन्ना शिंदे, दिनकर सुर्यवंशी आदी उपस्थित होते.चौकट...देवळा हि कांद्याची मोठी बाजारपेठ असून दररोज कोट्यावधी रु पयांची उलाढाल येथे होते. बाजार समितीत १९ कांदा खरेदीदार व्यापारी आहेत. शेतकºयांनी कांदा विक्र ी केल्यानंतर चोवीस तासांच्या आत व्यापाºयांनी कांदा विक्र ीचे पैसे शेतकºयांना देणे देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने बंधनकारक करूनही त्याचे पालन होत नव्हते.कांदा विक्र ीनंतर शेतकºयांना चोवीस तासांच्या आत रोख पेमेंट देण्याचा निर्णय व्यापाºयांशी चर्चा करून घेण्यात आला असून यापुढे नियमाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल. रोख पेमेंटबाबत तक्र ार असल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा.- माणिक निकम, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, देवळा. 

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड