शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पतीसह सासूकडे पत्नीची चाळीस लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:42 IST

पतीसह सासूचा छळ करून ४० लाख रुपयांची मागणी करणारी सून स्वाती प्रवीण गांगुर्डे तिचा भाऊ सागर पगारे, आई उषा हिरामण पगारे, विशाखा पगारे (रा़आदर्शनगर, साक्री, धुळे) व टिटवाळा येथील वकील अ‍ॅड़ पंकज राजबली मनोहर (रा़ बद्री पॅलेस, टिटवाळा, ठाणे) यांच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याता आला आहे़

नाशिक  : पतीसह सासूचा छळ करून ४० लाख रुपयांची मागणी करणारी सून स्वाती प्रवीण गांगुर्डे तिचा भाऊ सागर पगारे, आई उषा हिरामण पगारे, विशाखा पगारे (रा़आदर्शनगर, साक्री, धुळे) व टिटवाळा येथील वकील अ‍ॅड़ पंकज राजबली मनोहर (रा़ बद्री पॅलेस, टिटवाळा, ठाणे) यांच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याता आला आहे़ सुनेच्या त्रासामुळेच सासूचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप करून प्रवीण गांगुर्डे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आईचा मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेतली होती़ दरम्यान, या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनीही पैसे मागितल्याने त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे़दिंडोरीरोडवरील पोकार कॉलनीतील गणेश अपार्टमेंटमधील प्रवीण गांगुर्डे यांचा चार वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री येथील राणी उर्फ स्वाती भीमराव पगारेसोबत झाला होता. लग्नानंतर त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याने त्यांनी काही महिन्यांनी न्यायालयातून घटस्फोट घेतला़ यादरम्यान, सून राणी हिने पतीसह सासरच्यांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात शारीरिक व मानसिक छळाची फिर्याद दाखल केली. त्यानुसार पती प्रवीण गांगुर्डे याच्यासह त्याच्या भावावर व आईवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात म्हसरूळ पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. दरम्यान, अनेक महिन्यांपासून पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या वाºया कराव्या लागल्याने गांगुर्डे कुटुंबीय जेरीस आले होते.११ सप्टेंबर रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गांगुर्डे कुटुंबाला न्यायालयाने जामीन मंजूर केला; मात्र राणी हिने संशयित गांगुर्डे यांना जामीन मंजूर झाल्याबाबत न्यायालयात अपील दाखल केले. त्यामुळे गांगुर्डे कुटुंबीयांना पुन्हा न्यायालयात यावे लागले. यातच शुक्रवारी (दि़१४) राणी, तिची आई, भाऊ व वकिलाने पती प्रवीण गांगुर्डे व सासूकडे गुन्हा मागे घ्यायचा असेल तर चाळीस लाख रुपयांची मागणी केली़ तसेच पैसे न दिल्यास तुम्हा सगळ्यांना बसवून ठेवते, तुमच्या पूर्ण खानदानाची वाट लावते, असा दम दिला़ या छळामुळे सासू लीलाबाई खचल्या होत्या. त्यांना शुक्रवारी (दि. १४) रात्री हृदयविकाराचा झटका आला व मृत्यू झाला़ याप्रकरणी प्रवीण गांगुर्डे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, खंडणीसह शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़उपनिरीक्षकाची चौकशीम्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल गांगुर्डे यांच्यावरील गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी आरोपींना मदत करण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार केल्याचा आरोपी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे़ विशेष म्हणजे मुंबई नाका पोलीस ठाण्यात असतानाही हिरे यांची कारकिर्द वादग्रस्त राहिलेली आहे़ या प्रकरणातील हिरे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी दिली आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी