सुरगाणा : किरकोळ कारणांवरून पती-पत्नी यांच्यामध्ये निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील प्रतापगड येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतापगड शिवारात राहत असलेला रामा मोहन कुंवर याचा त्याची पत्नी विमल हिच्यासोबत गुरुवारी (दि.१०) पहाटे सहा वाजतापूर्वी किरकोळ कारणावरून वादावादी सुरू झाली. वादाचे पर्यवसान पतीकडून पत्नीला मारहाणीत झाले. यावेळी पती रामाने पत्नी विमल हीस दगड खडकावरून फरफटत ओढल्याने गंभीर दुखापत होऊन त्यात तिचा मृत्यू झाला. खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पती रामा यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बोडखे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
पतीच्या मारहाणीमुळे पत्नीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:04 IST
सुरगाणा : किरकोळ कारणांवरून पती-पत्नी यांच्यामध्ये निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील प्रतापगड येथे घडली
पतीच्या मारहाणीमुळे पत्नीचा मृत्यू
ठळक मुद्दे वादाचे पर्यवसान पतीकडून पत्नीला मारहाणीत झाले.