शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी नसताना जॉॅॅगिंग ट्रॅकचा घाट कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:04 IST

पंचवटीतील कुमावतनगर येथील चारीलगतच्या जागेत सव्वा कोटी खर्च करून जॉगिंग ट्रॅक साकारण्याबाबत आता या प्रभागातील भाजप नगरसेवक कमलेश बोडके यांनीच शंका उपस्थित केली आहे. जलसंपदा विभागाची परवानगी नसताना प्रशासनाने इतकी घाई कशासाठी केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक : पंचवटीतील कुमावतनगर येथील चारीलगतच्या जागेत सव्वा कोटी खर्च करून जॉगिंग ट्रॅक साकारण्याबाबत आता या प्रभागातील भाजप नगरसेवक कमलेश बोडके यांनीच शंका उपस्थित केली आहे. जलसंपदा विभागाची परवानगी नसताना प्रशासनाने इतकी घाई कशासाठी केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.महापालिकेची महासभा येत्या शुक्रवारी (दि.२०) होणार आहे. या सभेत पंचवटीतील प्रभाग क्रमांक पाचमधील कॅनॉललगत सव्वा कोटी रुपयांचा जॉगिंग ट्रॅक साकारण्यात येणार आहे. कॅनॉलची जागा जलसंपदा विभागाची असून त्यांची अद्याप स्पष्टपणे परवानगी घेण्यात आलेली नाही अशावेळी हा प्रकल्प साकारण्यावरून शंका उपस्थित केल्या जात आहेत. जागा ताब्यात नसताना इतकी घाई कशासाठी असा प्रश्न केला जात असताना प्रभागाचे नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी त्याचे समर्थन केले होते. पाटचारीच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेने हा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी प्रभागातील तीन नगरसेवकांनी प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचा निधी दिला आहे. जलसंपदा विभागाने स्थानिक स्तरावर परवानगी देण्यास अडचण नसल्याचे स्पष्ट केला असले तरी आता औरंगाबाद येथील गोदावरी महामंडळाकडून मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे बग्गा यांनी सांगितले असून, महामंडळाकडे पाठविलेल्या पत्राची प्रत सादर केली आहे. आता मात्र याच प्रभागाचे भाजप नगरसेवक कमलेश बोडके यांनी ट्रॅकच्या जागेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.मुळात जलसंपदाची परवानगी नसताना इतकी घाई करण्याची गरज नाही. त्यातच या जागेलगत एका खासगी विकासकाची जागा असून, आरक्षित भूखंडावरून महापालिका आणि विकासक यांच्यात न्यायालयीन लढा सुरू असल्याने ही जागा कशी काय मिळू शकते, त्याच प्रमाणे काही भागात डांबरीकरण झाले आहे त्यावर ट्रॅक कसा काय साकारणार असा प्रश्नदेखील बोडके यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक