शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

मूलभूत सुविधा नसताना स्मार्ट सिटी कशाला

By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST

धनंजय मुंडे : कृषी महोत्सवात चर्चासत्र

नाशिक : एकवेळ पंतप्रधानपद टिकविणे सोपे, पण गावचे सरपंचपद टिकविणे सर्वांत अवघड गोष्ट आहे. एकीकडे गावात मूलभूत सुविधा उपलब्ध नसताना दुसरीकडे आधीच आखीव-रेखीव असलेल्या नवी मुंबई-नागपूरसारख्या शहरांना केंद्र सरकार स्मार्ट सिटी करण्यासाठी निघाले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी केला.डोंगरे वसतिगृहावर सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवात शनिवारी (दि.२३) ‘सरपंच-ग्रामसेवक मांदियाळी’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार मुंडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष कैलास वाक््चौरे, विभागीय अध्यक्ष बापू अहिरे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील, केदा बापू काकुस्ते, तुकाराम सांगळे, शंकरराव खेमकर, यतिन कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, छबू नागरे, अर्जुन टिळे आदि उपस्थित होते. आमदार धनंजय मुंडे पुढे म्हणाले, गावकीचे राजकारण आणि निवडणुका या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा वेगळ्या निवडणुका असतात. राज्यात किंवा केंद्रात एखादा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम एखाद-दोन वर्षात दिसतात. मात्र सरपंचाने एखादा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी लगेचच उमटतात. आज ग्रामपंचायतीला सार्वभौम दर्जा मिळाला असून, गावचा विकास करण्याचा निर्णय गावकरी घेऊ शकतात. (प्रतिनिधी)