शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

आयुुक्तांचे ऐकता, मग नगरसेवकांचे का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:17 AM

काही दिवसांपूर्वी तपोवनात वॉकविथ कमिशनर कार्यक्रम असल्याने सलग चार दिवस साफसफाईचा घाट घातला, लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि आयुक्त येणार म्हणून दखल घेतली जाते, मग आयुक्त मुंढे काय आभाळातून पडले का? असा सवाल करीत संतप्त लोकप्रतिनिधींनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पंचवटी : काही दिवसांपूर्वी तपोवनात वॉकविथ कमिशनर कार्यक्रम असल्याने सलग चार दिवस साफसफाईचा घाट घातला, लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि आयुक्त येणार म्हणून दखल घेतली जाते, मग आयुक्त मुंढे काय आभाळातून पडले का? असा सवाल करीत संतप्त लोकप्रतिनिधींनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले.  पंचवटी प्रभागाची बैठक सोमवारी (दि. २३) सभापती पूनम धनगर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.प्रारंभीच नगरसेवक जगदीश पाटील यांनी उपअभियंत्याकडे विभागीय अधिकाºयांचा कारभार दिल्याने कामाचे नियोजन नाही अशी तक्रार केली. कमलेश बोडके यांनी मुंढे यांच्या कालावधीत स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगून साथीचे आजार वाढल्याने पेस्ट कंट्रोलचा ठेका रद्द करण्याचा ठराव करावा असे सांगितले. वाल्मीकनगरला घंटागाडी येत नाही परिणामी कचरा पाण्यात टाकावा लागतो, पथदीप बंद आहे अशी तक्रार सरिता सोनवणे यांनी केली. मोकाट श्वान पकडण्यासाठी संबंधित विभागाकडे तक्रार करूनही उपयोग नाही आम्हाला सांगा आम्ही कुत्रे पकडतो असे पूनम सोनवणे, सुरेश खेताडे यांनी सुनावले.  आयुक्त तुकाराम मुंढे हे वॉकविथ कमिशनर कार्यक्रमासाठी येणार असल्याने मनपाकडून सलग चार दिवस स्वच्छता मोहीम राबविली गेली, आम्ही वारंवार तक्रार करतो त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात मग आयुक्त म्हणजे राजा का? असा सवाल मच्छिंद्र सानप यांनी केला. यावेळी चर्चेत भिकुबाई बागुल, वसंत ढुमसे, संजय दराडे, आर. एस. पाटील, सचिन जाधव आदींनी सहभाग घेतला.  मनपाच्या अधिकाºयांना टेंडर बनविताना कोणता ठेकेदार त्यात कसा बसेल हे माहीत आहे, मग समस्या कशा सोडविता येतील याचा अंदाज नाही. अधिकारी हे लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या तक्रारींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात, असा आरोप नगरसेवक जगदीश पाटील यांनी केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका