शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एका व्यक्तीमुळे झाले अख्खे गाव क्वारंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 19:42 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या सध्या एकट्या जायखेड्यात असून, आरोग्य विभागाच्या तपासणीत ५५ व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्याने धावपळ उडाली आहे. या सर्वांना उपचारासाठी दाखल करण्यात आले

ठळक मुद्देजायखेड्याची नाकाबंदी : आरोग्य विभागाची धावपळगावातील सर्व दुकाने व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लॉकडाऊनच्या काळात गरज म्हणून घराकडे पायीच निघालेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविणाऱ्या बागलाण तालुक्यातील जायखेड्यातील एक युवकच कोरोनाबाधित झाला. परंतु त्याची लक्षणे वेळीच निदर्शनास न आल्याने योग्य तो उपचार होऊ शकले नाहीत, परिणामी त्याचा कोरोनाने बळी घेतला. मात्र त्याची पुसटशी कल्पनाही नसलेले ग्रामस्थ कळत न कळत त्याच्या संपर्कात आल्याने अखेर अख्ख्या गावालाच क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या सध्या एकट्या जायखेड्यात असून, आरोग्य विभागाच्या तपासणीत ५५ व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्याने धावपळ उडाली आहे. या सर्वांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असले तरी, बाधित रुग्णांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रुग्णाच्या घरापासून शंभर मीटरपर्यंत कन्टेन्मेंट झोन जाहीर केल्याने अख्खे गावच क्वारंटाइन झाले असून, गावातील सर्व दुकाने व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहे. दोन दिवसांपूर्वी एखाद्या गावात एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. वाहनचालक असलेल्या जायखेडा येथील तरुणाने लॉकडाउनच्या काळात अनेकांना मूळ गावी पोहोचविण्याचे काम केले. या काळात तो स्वत:च कोरोनाच्या विळख्यात सापडला. मात्र त्याची लक्षणे उशिरा लक्षात आली. तोपर्यंत त्याच्या संपर्कात कळत न कळत अनेक ग्रामस्थ आले. मात्र कोरोनामुळे त्याची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल केले व उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मात्र गावकऱ्यांचे धाबे दणाणले व त्यांनी तपासणी करून घेण्यास सुरुवात केल्यावर एकाच दिवसात ५५ कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आरोग्य विभागाने संपूर्ण गावात कन्टेन्मेंट झोन जाहीर केला असून, नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ७४ वैद्यकीय पथकांमार्फत प्रत्येकाची घरोघरी जाऊन तपासणी केली जात असून, शुक्रवारपर्यंत साडेचार हजार नागरिकांची आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक