शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

सटाणा नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी?

By admin | Updated: July 11, 2014 00:21 IST

सटाणा नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी?

सटाणा : येथील नगराध्यक्षपदासाठी १९ जुलै रोजी निवडणूक होत असून, निवडीचे वारे वाहू लागले आहेत. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या पदावर कोण विराजमान होतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.सटाणा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. या पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. यामुळे नूतन नगराध्यक्ष निवड बिनविरोध होणार असली तरीही नगरसेवकांच्या बैठका व सहलींचे नियोजन सुरू झालेले आहे. तब्बल अडीच वर्षे कार्यकाल असलेल्या अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दोन नगरसेवक आहेत. नगरसेवक सुलोचना चव्हाण व अनिल कुवर यांची नावे या स्पर्धेत आहेत. सुलोचना चव्हाण या माजी आमदार संजय चव्हाण यांच्या मातोश्री आहेत. यामुळे त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सटाणा पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस १३, भाजपा ३, शिवसेना १, रिपाइं १, काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र शहर विकासाच्या अनुषंगाने सर्व सदस्यांनी गत अडीच वर्षांच्या कार्यकालात पक्षीय अभिनिवेश बाजूला सारत कामकाज केलेले आहे. यामुळे सर्वसमावेशक असे कामकाज या ठिकाणी सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदी सुलोचना चव्हाण यांना विराजमान करून राज्य शासनाकडून अधिकाधिक विकासकामांचा लाभ पदरात पाडून घेणे सोयीचे ठरावे याकरिता रणनीती आखली जाणार आहे. काका रौंदळ व बाळासाहेब सोनवणे यांच्या माध्यमातून नगरसेवकांची विशेष बैठक आयोजित करण्यात येऊन मते जाणून घेतली.जाणार असल्याचे सांगितले गत अडीच वर्षांचा कार्यकाल महिलाराज म्हणून गेलेला असताना नूतन नगराध्यक्षपदी सुलोचना चव्हाण यांची निवड झाल्यास पाचही वर्षे महिला राज पालिकेत असणार आहे़गत कार्यकाळात सुमनबाई दगाजी सोनवणे, कौशल्याताई पांडुरंग सोनवणे व सुशीलाबाई दादाजी रौंदळ यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपली टर्म पूर्ण केलेली आहे़