शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यातील मिरवणूकीला परवानगी नेमकी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 22:43 IST

सटाणा: शाहीर अण्णा भाऊ साठे व वीर एकलव्य यांच्या जयंती उत्सवास परवानगी नाकारणारे पोलीसच आपल्या वरिष्ठाच्या निरोप समारंभानिमित्त गावातून सवाद्य मिरवणूक काढतात. सामान्यांसाठी नियमांची आडकाठी आणणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या मिरवणूकीसाठी परवानगी नेमकी कोणाची होती...पोलिस अधीक्षकांची की गृहमंत्र्यांची असा सवाल शहर व तालुकावासीयांच्या मनात उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनागरिकात सवाल : पोलिस निरीक्षकाच्या निरोपाला नियमांचा विसर

सटाणा: शाहीर अण्णा भाऊ साठे व वीर एकलव्य यांच्या जयंती उत्सवास परवानगी नाकारणारे पोलीसच आपल्या वरिष्ठाच्या निरोप समारंभानिमित्त गावातून सवाद्य मिरवणूक काढतात. सामान्यांसाठी नियमांची आडकाठी आणणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या मिरवणूकीसाठी परवानगी नेमकी कोणाची होती...पोलिस अधीक्षकांची की गृहमंत्र्यांची असा सवाल शहर व तालुकावासीयांच्या मनात उपस्थित होत आहे.दोन वर्षांपूर्वी सटाणा पोलीस ठाण्यातील निरीक्षकपदाची सुत्रे नंदकुमार गायकवाड यांनी स्वीकारली होती. दोन वर्षाच्या काळात त्यांनी केलेला नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न, कोविडची परिस्थिती हाताळण्यासाठी दिलेले योगदान व शासकीय निधी नसताना पोलीस स्टेशन आवाराचे केलेले सुशोभिकरण यामुळेत्यांची विविध क्षेत्रात छाप पडली होती. चार दिवसांपूर्वी गायकवाड यांची सटाणा येथून बदली झाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्साहाच्या भरात गायकवाड यांना कल्पना न देता दोन दिवसांपूर्वी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नकार देऊनही पोलीस स्टेशन, सटाणा बसस्थानक, शिवतीर्थापासून मुख्य बाजारपेठेतून यशवंतराव महाराजांच्या मंदिरापर्यत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान शहरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. अतीउत्साहीपणा काहीही करू शकतो याचे प्रत्यंतर पोलिस कर्मच्या-यांनीच शहर व तालुकावासीयांना आणून दिले. सदर मिरवणूक मार्गक्रमण करीत असताना चाहत्यांनी व्हिडीओ व फोटो सोशल मिडियावरुन व्हायरल केले, त्यामुळे काही क्षणातच सटाण्यातील पोलिसांची मिरवणूक महाराष्ट्रभर पोहोचली. कोविडच्या पार्श्वभूमीवर रात्री १० वाजेपर्यंत सर्व व्यवसाय व सामाजिक कार्यक्रमांना निर्बंध असतांना पोलिसांचा कार्यक्रम १० वाजून ३० मिनिटांनी संपतो. यावरुन नागरिकांना नियमांची आठवून करुन देणाऱ्या पोलिसांसाठी वेगळी नियमावली असते का असा प्रश्नही नागरिकात उपस्थित होत आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSocialसामाजिक