शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा-डीजीपीनगर रस्त्यावर पांढरे पट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:42 IST

वाहतुकीसाठी असुरक्षित बनत चाललेल्या वडाळा-डीजीपीनगरमार्गे पुणे-मुंबई महामार्गांना जोडणाऱ्या संत सावता माळी कॅनॉल रस्त्यावर ठिकठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी अजूनही पांढºया पट्ट्यांची प्रतीक्षा आहे.

नाशिक : वाहतुकीसाठी असुरक्षित बनत चाललेल्या वडाळा-डीजीपीनगरमार्गे पुणे-मुंबई महामार्गांना जोडणाऱ्या संत सावता माळी कॅनॉल रस्त्यावर ठिकठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी अजूनही पांढºया पट्ट्यांची प्रतीक्षा आहे. वडाळा-डीजीपीनगर रस्ता हा वर्दळीचा आहे. या रस्त्यावर नेहमीच अपघात घडतात. रस्त्याला ठिकठिकाणी धोकादायक अपघाती वळणं आहेत. यामुळे या वळणांवरून मार्गस्थ होताना वाहने समोरासमोर येऊन अपघात घडतो. या रस्त्याला उपनगरांमधील जोड रस्तेदेखील येऊन मिळतात. त्यामुळेही या रस्त्यावरील वाहतूक असुरक्षित होते. वडाळा चौफुली, रहेमतनगर येथे पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. मात्र येथून पुढे खोडेनगर, पांडुरंग चौक, म्हसोबा चौक, गणेशनगर जोड रस्ता या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे.तसेच रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी पांढरा पट्टा मारला जावा, अशी मागणी होत आहे. तसेच दुभाजकाजवळ व रस्त्याच्या कडेला धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.या रस्त्यावरील रविशंकर मार्गाच्या टी-पॉइंटवरील वाहतूक बेटापासून पुढे डीजीपीनगर, विघ्नहरण गणेश मंदिरापर्यंतचे पथदीप बंद असल्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य कायम आहे. या मार्गावरील बंद पथदीप त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.पथदीपांची मागणीनव्या वाहतूक बेटामध्ये नव्याने पथदीप बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत महापालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखेने संयुक्तरीत्या प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक