शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

पळा पळा चोर कुठे पुढे पळे तो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:15 IST

कुठे दुर्घटना घडली की ती कळवल्यानंतर वाजत गाजत येणाऱ्या पोलिसांमुळे चोर सावध होऊन पळून जातोच शिवाय परिसरातील नागरिक सांगत असतानाही पोलीस त्याची दखल घेत नाही

नाशिक : कुठे दुर्घटना घडली की ती कळवल्यानंतर वाजत गाजत येणाऱ्या पोलिसांमुळे चोर सावध होऊन पळून जातोच शिवाय परिसरातील नागरिक सांगत असतानाही पोलीस त्याची दखल घेत नाही, त्यामुळे चोरट्याचे फावते आणि तो पसार होतो, असा अनुभव दीपालीनगरवासीयांनी घेतला.  काही दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून, पोलिसांच्या आगमनानंतरदेखील चोर शिताफीने पळून गेल्याने व अद्यापही तो पोलिसांच्या हाती न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दीपालीनगर हा बराच विकसित भाग आहे. काही दिवसांपूर्वी या भागात मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे शिरल्याचे कळताच परिसरातील नागरिक जागरूक झाले. आपलाशेजारी खरा पहारेकरी हे पोलिसांचेच घोषवाक्य असल्याने सारेच रस्त्यावर आले आणि चोरट्याला शोधू लागले. याचवेळी पोलिसांना कळवण्यात आले. परंतु पोलिसांनी शांततेत येण्याऐवजी सायरनची वर्दी देत दाखल झाले. त्यामुळे चोरटे अधिकच सावध झाले असावेत. नागरिकांना ते ज्या भागात गेल्याचा संशय होता ते सर्व सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोधापेक्षा चौकशीतच वेळ घालविला त्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांचे शोध कार्य कमी पडल्यानंतर नागरिकांना पुन्हा अन्य भागांत चोरटे गेल्याचा संशय आला. त्यानुसार पुन्हा पोलिसांना कळवण्यात आले. पुन्हा ज्यादा पोलीस फाटा, बीट मार्शलसह त्याच पद्धतीने सायरनने वर्दी देत हजर झाला. बहुदा त्यामुळेच चोरटे पुन्हा अन्यत्र पळाल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यामुळे चोर पोलीस असा पाठ शिवणीचा खेळ सुरू झाला. पहाटेपर्यंत शोध मोहीम राबविली गेली, परंतु ती अयशस्वी झाली. त्या दिवशी चोरटे गेले आणि नंतरही पोलिसांना सापडले नाही. त्यामुळे नागरिक मात्र चिंताक्रांत झाले असून चोरटे केव्हाही येतील या चिंतेने जागरण करू लागले आहेत.

टॅग्स :Policeपोलिसtheftचोरी